Bengal Ram Navami Violence Case : बंगालमध्ये गेल्या वर्षीच्या रामनवमी हिंसेच्या प्रकरणी १६ मुसलमानांना अटक !

कोलकाता (बंगाल) – बंगालमध्ये गेल्या वर्षी रामनवमीच्या दिवशी झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने १६ मुसलमानांना अटक केली आहे. या सर्वांना कट रचणे, दंगल भडकावणे आणि धार्मिक मिरवणुकीवर आक्रमण केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. ‘एन्.आय.ए.’ला तपासाच्या वेळी हिंसाचाराचे  चित्रीकरण (व्हिडिओ फुटेज) पाहून १६ जणांची ओळख पटली.

१. बंगालमधील उत्तर दिनाजपूर जिल्ह्यात ३० मार्च २०२३ या दिवशी विश्‍व हिंदु परिषदेच्या रामनवमी मिरवणुकीत धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर आक्रमण केले होते.

२. २४ घंट्यांनंतर हावडा येथील शिबपूरमध्ये पुन्हा दगडफेक झाली होती. यामध्ये ३ पोलिसांसह अनुमाने १५ जण घायाळ झाले होते, तर १० हून अधिक वाहने जाळण्यात आली. २० हून अधिक दुकानांची तोडफोड करण्यात आली.

३. अफरोझ आलम, महंमद अश्रफ, महंमद इम्तियाज आलम, महंमद इरफान आलम, कैसर, महंमद फरीद आलम, महंमद फुरकान आलम, महंमद पप्पू, महंमद सुलेमान, महंमद सरजान, महंमद नुरूल होडा, महंमद वसिम, महंमद सल्लाहुद्दीन, महंमद जाननाथ, वसीम अक्रम आणि महंमद तन्वीर आलम अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे यंत्रणेने प्रसारित केलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आली आहेत.

संपादकीय भूमिका

  • दंगल होऊन १ वर्षाचा कालावधी झाला. त्यामुळे ‘दंगलखोरांना अटक करण्यासाठी एवढा अवधी का लागला?’, याचे उत्तर अन्वेषण यंत्रणांनी द्यायला हवे.
  • बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केल्यास या समस्या सुटतील, असेच हिंदूंना वाटते !