मुंबईत शस्त्रास्त्रे बाळगणार्‍याला अटक, गुन्हा नोंद !

मुंबई – हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोन गुन्हे नोंद असलेल्या सराईत गुन्हेगाराला शस्त्रास्त्रांसह वरळी परिसरातून अटक करण्यात आली. त्याच्याकडे पिस्तुल आणि जिवंत काडतुसे सापडली असून त्याच्याविरोधात शस्त्रास्त्र प्रतिबंधक कायद्यांअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पांडुरंग तांबे उपाख्य सॅव्हिओ रॉड्रीग्स (वय ४२ वर्षे) असे त्याचे नाव आहे.

संपादकीय भूमिका

अशा सराईत गुन्हेगारांना कठोर शिक्षाच व्हायला हवी !