शिरूर (पुणे) येथील चोरीला गेलेले देवाचे दागिने शोधण्यात पोलिसांना यश !

श्री खंडोबा देवाचे अडीच ग्रॅम सोन्याचे डोळे चोरांनी ऑगस्टमध्ये चोरून नेले होते. याविषयी देवाचे पुजारी शरद गुरव यांनी तक्रार प्रविष्ट केली होती.

तिघांना अटक; २० जिवंत काडतुसे असलेले मॅगझिन हस्तगत !

येथील मुंबई पोर्ट ट्रस्टच्या संवेदनशील यलो गेटमध्ये रात्री २ वाजता घुसलेल्या अज्ञात चारचाकीचा शोध मुंबई पोलिसांनी लावला आहे. सीसीटीव्ही चित्रण आणि तांत्रिक साहाय्य यांच्या आधारे पोलिसांनी या चारचाकीतील तिघांना कह्यात घेऊन अटक केली आहे.

काश्मीरमध्ये ५ आतंकवाद्यांना अटक

पोलिसांनी गेल्या २४ घंट्यांत एकाच वेळी ४ वेगवेगळ्या ठिकाणी आतंकवादविरोधी कारवाया करून या ५ जणांना अटक केली. त्यांच्याकडून शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला.

आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना अटक

वर्ष २०२१ मध्ये चंद्राबाबू नायडू यांच्या विरोधात कौशल्य विकास घोटाळ्यावरून गुन्हा नोंदवण्यात आला होता. २५० कोटी रुपयांच्या या घोटाळ्यामध्ये चंद्रबाबू हे प्रथम क्रमांकाचे आरोपी आहेत. त्यांच्यावर लावण्यात आलेली कलमे अजामीनपात्र आहेत.

उदयनिधी स्टॅलिन, प्रियांक खर्गे आणि ए. राजा यांना अटक न केल्यास देशभर आंदोलन करणार ! – हिंदु जनजागृती समितीची चेतावणी

सनातन धर्माची डेंग्यू, मलेरिया, कोरोना, एड्स आणि कुष्ठरोग यांच्याशी तुलना अक्षम्यच !

समलैंगिक संबंध ठेवणार्‍या मुसलमान शिक्षकाची पीडित अल्पवयीन विद्यार्थ्याकडून गळा चिरून हत्या !

मदरशांमध्ये मुलांचेही लैंगिक शोषण केले जात असल्याच्या घटना यापूर्वी उघड झाल्या आहेत. सरकारने ‘अशा घटना घडत आहेत का ?’, याची पोलिसांद्वारे आधीच चौकशी केली, तर पुढील अनर्थ टळू शकते !

राजापूर येथे पोलिसांच्या वाहनावर गोळीबार करून पसार झालेल्या तिघांना आंबोली येथे अटक

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाच्या वाहनावर गोळीबार करून पसार झालेल्या तिघांना सावंतवाडी पोलिसांनी आंबोली येथे कह्यात घेतले आहे, तसेच त्यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे. 

नाशिक येथे लाच घेतांना जी.एस्.टी. अधिकार्‍यांसह ४ जणांना अटक ! 

तक्रारदाराचा विज्ञापन चित्रीकरणाचा व्यवसाय असून त्याचे जी.एस्.टी. भरणे बाकी होते. जी.एस्.टी. अधिकारी जगदीश पाटील यांनी ‘चित्रीकरणाची वाहने ‘जी.एस्.टी.’चा दंड न भरता सोडून देतो’, असे सांगत ४० सहस्र रुपयांची लाच मागितली.

स्वीडनमध्ये कुराण जाळल्यानंतर पुन्हा हिंसाचार

मालमो शहरातील रोजेनगार्ड परिसरात इस्लामला विरोध करतांना सलवान मोमिका याने कुराणाची प्रत जाळली. त्यामुळे अनेक ठिकाणी जाळपोळ आणि दगडफेक करण्यात आली.