१२ लाख रुपयांची अवैध मद्याची वाहतूक केल्याप्रकरणी दोघांना पोलीस कोठडी

सातत्याने गोवा राज्यातून सिंधुदुर्ग जिल्हा आणि महाराष्ट्रात अवैध मद्याची वाहतूक होत असल्याच्या घटना उघड होत आहेत. पोलिसांनी कारवाई केली, तरीही हे प्रकार चालूच आहेत.

पाकमध्ये मुसलमान तरुणाचा विवाहाचा प्रस्ताव नाकारणार्‍या ख्रिस्ती तरुणीची हत्या

याविषयी भारतातील तथाकथित निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी आणि पाकप्रेमी तोंड उघडणार नाहीत, हे लक्षात घ्या !

बंदुकीची गोळी लागून युवकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी चौघांना पोलीस कोठडी

युवराज दीपक वारंग (वय १८ वर्षे) या युवकाचा २६ नोव्हेंबरला छातीत बंदुकीची गोळी (छरा) घुसून मृत्यू झाला होता. या प्रकरणी कुडाळ पोलिसांनी ४  संशयितांना अटक केली अन् त्यांच्याकडून २ बंदूका कह्यात घेतल्या.

अश्‍लील ध्वनिचित्रफीत दाखवून लैंगिक अत्याचार करणार्‍या २ युवांवर गुन्हा नोंद

अल्पवयीन मुलांना भ्रमणभाषवर अश्‍लील ध्वनिचित्रफीत दाखवून त्यांच्यावर अत्याचार केल्याची तक्रार फलटण पोलिसात नोंदवण्यात आली.

आतंकवाद्यांचा कारखाना असणार्‍या पाकला नष्ट करा !

जम्मू-काश्मीरमध्ये या वर्षीच्या ११ मासांमध्ये सुरक्षादलांनी २११ आतंकवाद्यांना ठार केले, तर ४७ जणांना अटक केली आहे. याव्यतिरिक्त आतंकवाद्यांना साहाय्य करणार्‍या १५० जणांना अटक करण्यात आली आहे.

‘हिंदू गद्दार आहेत’ अशी टीका करणार्‍या क्रिकेटपटू युवराज सिंह यांच्या वडिलांना अटक करण्याची मागणी

देहलीच्या सीमेवर चालू असलेल्या पंजाब आणि हरियाणा येथील शेतकर्‍यांच्या आंदोलनामध्ये खलिस्तानवादीही सहभागी झाल्याचे समोर येत आहे. आता योगराज सिंह यांचे विधान पहाता अशा लोकांना केंद्र सरकारने  शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करून देशद्रोही खलिस्तानी वळवळ चिरडून टाकली पाहिजे !

देहलीमध्ये लाचखोरीच्या प्रकरणात भाजपच्या नगरसेवकाला अटक

कारवाई झाली, तरच अन्य लोकप्रतिनिधी भ्रष्टाचार करण्यास धजावणार नाहीत !

शिकारीसाठी अवैधरित्या शस्त्रे घेऊन फिरणारे १६ जण पोलिसांच्या कह्यात

एवढ्या मोठ्या प्रमाणातील शस्त्रे केवळ शिकारीसाठीच बाळगली असतील, यावर विश्‍वास कसा ठेवायचा ?

देवगड येथे गुटख्याची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी एकाला अटक

८६ सहस्र ६४० रुपये किमतीचा गुटखा आणि पानमसाला कह्यात

१ सहस्र १०० कोटी रुपयांचा घोटाळा होईपर्यंत झोपलेले पोलीस !

‘पुण्यातील भाईचंद हिराचंद रायसोनी (बी.एच्.आर्.) पतसंस्थेतील आर्थिक घोटाळ्याच्या प्रकरणी पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने कारवाई करून अनेक  पुरावे शासनाधीन केले आहेत. यात अनुमाने १ सहस्र १०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार  झाला आहे.