बुधवार पेठेत (पुणे) ३ मासांपासून अवैध वास्तव्य करणार्‍या १९ बांगलादेशींना अटक !

बांगलादेशी नागरिक ३ मासांपासून अवैध पद्धतीने वास्तव्य करत असतांना पोलिसांना याचा थांगपत्ता कसा लागत नाही ?

गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये निदर्शने : भारतात विलीन करण्याची मागणी

निर्दशनांत सहभागी झालेले लोक भारतात विलीनीकरणाची मागणी करत आहेत. गिलगिट बाल्टिस्तान मधील नेत्यांनी पाकिस्तानी प्रशासनाला गृहयुद्धाची चेतावणी दिली आहे.

माजी जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांना अटक !

पोलिसांनी खरे यांची चौकशी केली असता त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे त्यांच्यावरील संशय बळावल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली.

‘भारतरत्न’ नव्हे, ‘जुगाररत्न’चे फलक दाखवून आमदार बच्चू कडू यांचे सचिन तेंडुलकर यांच्या घरासमोर आंदोलन !

पैसा महत्त्वाचा नाही, देश महत्त्वाचा आहे, हे सचिन तेंडुलकर यांनी लक्षात घेतले पाहिजे. त्यांनी विज्ञापन सोडावे किंवा भारतरत्न तरी परत करावा, असे आवाहन या वेळी बच्चू कडू यांनी केले.

पनवेल आणि भिवंडी येथून भांगमिश्रित पदार्थांचा साठा जप्त !

विविध ‘ब्रँड’च्या छोट्या मोठ्या प्लास्टिकच्या पिशव्यांमधून भांगमिश्रित पदार्थांची साठवणूक आणि विक्री करणार्‍यांवर उत्पादन शुल्क विभागाच्या राज्य भरारी पथकाने पनवेल आणि भिवंडी येथे धाड घालून कारवाई केली आहे.

मंत्रालयात बाँब ठेवल्याचा दूरध्वनी, चाकू बाळगणार्‍या एकाला अटक !

निनावी दूरभाष करणारी व्यक्ती नगर जिल्ह्यातील असल्याचे प्राथमिक अन्वेषणात आढळून आले आहे. यानंतर मंत्रालयाची इमारत आणि आजूबाजूच्या परिसरात शोधमोहीम राबवण्यात आली. या वेळी कुठेही बाँब सापडला नाही.

नाशिक येथे प्रयोगशाळेतील अधिकार्‍याला लाच घेतल्याप्रकरणी अटक !

सरकारी जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेतील वरिष्ठ अनुजीव साहाय्यक वैभव सादिगले यांना शहरातील एका ‘केटरिंग’ (अन्न पुरवण्याचा व्यवसाय) व्यावसायिकाला ‘पाण्याच्या नमुन्यांचा अहवाल चांगला आहे’, असा निर्वाळा द्यायचा होता.

भारतात अमली पदार्थांची तस्करी करणार्‍यांना साहाय्य करणार्‍या लाहोरच्या (पाकिस्तान) पोलीस उपायुक्ताला अटक

इक्बालला या प्रकरणाची कुणकुण लागताच त्याने अंतरिम जामीन मिळवण्याचा प्रयत्न केला; परंतु तो अयशस्वी झाला. यानंतर त्याला अटक करण्यात आली.

चिक्कमगळुरू (कर्नाटक) येथे मटण म्हणून गोमांस असलेले जेवण देणार्‍या हॉटेल्सवर पोलिसांची धाड !

पोलिसांनी ‘न्यामत’ या हॉटेलमधून २० किलो गोमांस जप्त केले. हॉटेल मालक इर्शाद अहमद याला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी करण्यात येत आहे.

अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ करणार्‍या ७४ वर्षीय अलिमिया सोलकर याला १ वर्षाचा कारावास

अलिमिया महंमद सोलकर याने अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याच्या प्रकरणी पॉक्सो न्यायालयाकडून १ वर्षाचा कारावास आणि ४ सहस्र रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.