India At UN : युद्धविराम करून ओलिसांची तात्काळ सुटका करा !

हमास-इस्रायल युद्धावरून भारताची संयुक्त राष्ट्रांत मागणी

संयुक्त राष्ट्रांतील भारताचे उपप्रतिनिधी आर्. रवींद्र

न्यूयॉर्क (अमेरिका) – हमास आणि इस्रायल यांच्यामध्ये गेल्या ९ महिन्यांपासून युद्ध चालू आहे. काही देश कायमस्वरूपी युद्धबंदीसाठी इस्रायलवर दबाव आणत आहेत. संयुक्त राष्ट्रांमध्ये युद्धविराम आणि ओलिसांची सुटका, ही सूत्रे उपस्थित करण्यात आल्यावर भारताने गाझामध्ये तात्काळ युद्धविराम अन् ओलिसांची कोणत्याही अटीविना सुटका करण्याचे आवाहन केले.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पश्‍चिम आशियावरील चर्चेत संयुक्त राष्ट्रांतील भारताचे उपप्रतिनिधी आर्. रवींद्र यांनी म्हटले की, भारत पॅलेस्टाईनच्या लोकांसाठी एक विश्‍वासार्ह विकास भागीदार आहे. गेल्या वर्षी ७ ऑक्टोबर या दिवशी इस्रायलवर झालेल्या आतंकवादी आक्रमणाचा तीव्र निषेध करणार्‍या देशांमध्ये भारताचा समावेश आहे. आम्ही गाझापट्टीमध्ये तात्काळ आणि संपूर्ण युद्धविराम करण्याचा पुनरुच्चार करतो.