परात्पर गुरु डॉ. आठवले यांची साधकांनी उलगडलेली वैशिष्ट्ये !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी घेतलेले अभ्यासवर्ग : खंड ३

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

केवळ अभ्यासवर्गांतील मार्गदर्शनातूनच नव्हे, तर स्वतःच्या आचरणातूनही ‘आदर्श साधक’ घडवणारी महान विभूती म्हणजे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले ! परात्पर गुरु डॉक्टरांनी केवळ काही वर्षे घेतलेल्या अभ्यासवर्गांतून अनेक साधक घडले आणि चांगली साधना करून ते अध्यात्मात पुढे गेले. प्रस्तुत ग्रंथात परात्पर गुरु डॉक्टरांची अभ्यासवर्गांत शिकवण्याची अलौकिक पद्धत, अभ्यासवर्गांत येणार्‍या जिज्ञासूंनी सत्सेवेकरता उद्युक्त होणे, परात्पर गुरु डॉक्टरांनी अभ्यासवर्गांत येणार्‍या साधकांना चुकांची जाणीव करून देणे इत्यादींविषयी साधकांनी कृतज्ञताभावाने लिहून दिलेली सूत्रे समाविष्ट आहेत. अध्यात्मातील एक आदर्श मार्गदर्शक, आदर्श साधक आणि आदर्श शिष्य, असे परात्पर गुरु डॉक्टरांच्या व्यक्तीमत्त्वाचे विविध पदर उलगडणारा हा ग्रंथ जिज्ञासू आणि साधक यांना साधनेत पुढे पुढे जाण्यासाठी निश्चितच मार्गदर्शक आहे !

संकलक : परात्पर गुरु डॉ. आठवले आणि पू. शिवाजी वटकर

आमची अन्य प्रकाशने आमची अन्य प्रकाशने

  • सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी केलेली गुरुसेवा व त्यांचे शिष्यत्व
  • परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांची गुरुभेट आणि त्यांनी गुरूंकडून शिकणे

सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी SanatanShop.com

संपर्क : ९३२२३ १५३१७