Rajasthan Teacher Suspended : आदिवासी महिलांना ‘त्या हिंदु नाहीत’, असे सांगत कुंकू न लावण्याचे आणि मंगळसूत्र न घालण्याचे आवाहन करणारी शिक्षिका निलंबित !

बांसवाडा (राजस्थान) – राजस्थानमध्ये आदिवासी महिलांना त्या हिंदु नसल्याचे शिकवणार्‍या सरकारी शिक्षिकेला निलंबित करण्यात आले आहे. मेनका डामोर असे या शिक्षिकेचे नाव आहे. तिच्याविरुद्ध ‘राजस्थान आचार नियमां’तर्गत कारवाई करण्यात आली आहे. बांसवाडा येथील मानगढ धाममध्ये १९ जुलै रोजी आयोजित केलेल्या सभेमध्ये मेनका यांनी आदिवासी महिलांना आवाहन केले होते की, ‘आदिवासी महिला कुंकू लावत नाहीत, तसेच मंगळसूत्र घालत नाहीत. आदिवासी समाजातील महिला आणि मुली यांनी शिक्षणाकडे लक्ष दिले पाहिजे. आजपासून सर्व उपवास बंद करा. आपण हिंदु नाही.’

मेनका यांच्या या आवाहनावर आदिवासी समाजातील महिलांनीच प्रथम आक्षेप घेतला आणि त्यानंतर शासनाच्या शिक्षण विभागाने मेनका यांच्यावर कारवाई करून त्यांना निलंबित केले. मेनका डामोर ‘आदिवासी कुटुंब संस्थे’च्या संस्थापिका असून त्या साडा येथील शासकीय उच्च माध्यमिक विद्यालयात कार्यरत आहेत.

संपादकीय भूमिका 

अशांना नुसतेच निलंबित करू नये, तर त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली पाहिजे !