नवी देहली – विरोधकांनी आता त्यांचा पराभव मान्य करावा आणि लोकहितासाठी सरकारला साथ देऊन कामे करावीत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनच्या दुसर्या सत्रापूर्वी ते बोलत होते.
देशाचा विचार करून सर्व पक्षांनी एक व्हावे !
पंतप्रधान पुढे म्हणाले, ‘‘आमच्या तिसर्या सत्ताकाळातील पहिला अर्थसंकल्प आम्ही मांडत आहोत. हा अर्थसंकल्प अमृतकाळातील महत्त्वाचा अर्थसंकल्प आहे. वर्ष २०४७ मधील विकसित भारताचा पाया रचणारा हा अर्थसंकल्प आहे. निवडून आलेल्या सर्व पक्षांच्या खासदारांचे कर्तव्य आणि दायित्व आहे की, येत्या ५ वर्षांत देशासाठी कार्य केले पाहिजे. पक्षापुरता मर्यादित विचार न करता देशाचा विचार करून सगळ्यांनी एक व्हावे.’’