साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती !

‘सनातन प्रभात’ नियतकालिकांमध्ये एखादा विषय विस्तृतपणे मांडण्यासाठी विविध लेखकांच्या लिखाणाचाही समावेश केला जातो. अशाच प्रकारे वि. श्री. काकडे यांनी लिहिलेल्या ‘चिंतन’ (भाग १ आणि २) या पुस्तकांतील लिखाण सर्वांपर्यंत पोचावे म्हणून ‘सनातन प्रभात’मध्ये छापायचे आहे. यासाठी लेखक ‘वि.श्री. काकडे’ यांची अनुमती घ्यायची आहे; परंतु या पुस्तकांमध्ये त्यांचा अथवा अन्य कुणाचाही संपर्क क्रमांक अथवा पत्ता दिलेला नाही. यासाठी वाचक अथवा साधक यांना वि.श्री. काकडे यांच्याबाबत काही माहिती असल्यास त्यांनी कृपया खालील क्रमांकावर/पत्त्यावर कळवावी.

श्री. काकडे यांनी लिहिलेली अन्य पुस्तके कुणाकडे उपलब्ध असल्यास त्यांनीही कृपया संपर्क करावा.

टपालासाठी पत्ता :  दैनिक ‘सनातन प्रभात’ कार्यालय ः ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा – ४०३ ४०१

संपर्क :  दू.क्र. : (०८३२) २३१२६६४

भ्रमणभाष क्र. : ८१८०९६८६४०