संयुक्त राष्ट्र महासभेत भारताकडून इस्रायल-हमास यांच्यातील युद्धविरामाचे स्वागत !

२९ नोव्हेंबर या दिवशी आंतरराष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने भारत पॅलेस्टिनी लोकांसमवेत सार्वकालिक संबंध असल्याची पुष्टी करतो. पॅलेस्टाईन येथे शांती आणि समृद्धी नांदावी, या सूत्राचे आम्ही  समर्थन करतो.

Indian Navy Day 2023 Reharsals : तारकर्ली येथील समुद्रकिनारी नौदलाच्या युद्धनौकांद्वारे प्रात्यक्षिकांना प्रारंभ !

या समारंभाचा भाग म्हणून नौदलाच्या युद्धनौका २७ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर २०२३ या कालावधीत येथे सराव करणार होत्या. त्यानुसार आज २८ नोव्हेंबरला युद्धनौकांच्या प्रात्यक्षिकांच्या सरावाला प्रारंभ झाला आहे.

Indian Navy Day 2023 : नौसेना दिनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करण्याचे पोलिसांचे आवाहन

या कालावधीत शहर, तसेच अतीमहनीय व्यक्ती ये-जा करणारे रस्ते आणि परिसर येथील नागरिकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने मालवण पोलिसांचे आवाहन !

Petroleum Products In Water Causes Fire : माटवे, दाबोळी (गोवा) येथे पेट्रोलियम पदार्थ मिसळल्याने विहिरीतील पाण्याला आग लागण्याचा प्रकार !

या गळतीमुळे ज्वलनशील द्रवपदार्थ भूमीत झिरपत असून ते भूजल दूषित करत आहेत. दाबोळीसह चिखली, चिकोळणा आणि बोगमाळो येथे ही हाच प्रकार !

FDA Raids : पुणे येथे अन्न आणि औषध प्रशासनाने टाकल्या ३ दिवसांत ९ ठिकाणी धाडी !

लाखो रुपयांचा गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू आणि सुपारी आदींचा साठा शासनाधीन !

विवाहाच्या निमित्ताने इतरांना सनातनचे ग्रंथ, लघुग्रंथ किंवा सात्त्विक उत्पादने भेट द्या !

सध्या लग्नसराई चालू झाली आहे. विवाह समारंभात एकमेकांना भेटवस्तू देण्याची प्रथा असते.

शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणार्‍या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक म्हणून द्या !

शाळांचे मुख्याध्यापक आणि महाविद्यालयांचे प्राचार्य यांना नम्र विनंती !

विधीमंडळाच्या नागपूर अधिवेशनकाळात शासकीय अधिकारी आणि कर्मचारी करतात मद्य-मांसाच्या मेजवान्या !

मौजमस्तीकडे कल असलेले शासकीय अधिकारी कामकाज कसे करत असतील ?, याची यावरून कल्पना येते. याविषयी केवळ परिपत्रक काढून न थांबता मद्यपी अधिकार्‍यांवर प्रशासनाने कठोर कारवाई करावी !

अपघातग्रस्‍तांकडे दुर्लक्ष न करता त्‍यांना त्‍वरित साहाय्‍य करा !

‘अपघातानंतर अपघातग्रस्‍तांना साहाय्‍य करण्‍यास सहसा कुणी धजावत नाही. अपघातग्रस्‍तांना साहाय्‍य केल्‍यास पुढे साक्ष, पुरावा आदींसाठी पोलीस ठाण्‍यात हेलपाटे मारावे लागतात. हा त्रास टाळण्‍यासाठी बरेच जण इच्‍छा असूनही अपघातग्रस्‍तांना साहाय्‍य करत नाहीत; मात्र ‘अपघातग्रस्‍तांना साहाय्‍य न करणे’ योग्‍य नाही.

सनातनच्या आश्रमांमध्ये वैद्यकीय उपचारांसाठी विविध उपकरणांची आवश्यकता !

‘सनातनच्या विविध ठिकाणच्या आश्रमांमध्ये राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य निःस्वार्थीपणे करणारे वेगवेगळ्या वयोगटांतील शेकडो साधक रहात आहेत. वृद्ध साधकांसाठी, तसेच हृदयविकार, मधुमेह, संधीवात आदी शारीरिक व्याधी असलेल्या रुग्ण-साधकांसाठी…