अंनिसवाले याची उत्तरे देतील का ?

ज्‍या अर्थी महाराजांवर कोणतीही कायदेशीर कारवाई झालेली नाही, त्‍या अर्थी कायद्यानुसार काहीही चुकीचे घडलेले नाही. नेहमीप्रमाणे अंनिसवाल्‍यांनी उठवलेली ही अफवा आहे. त्‍यामुळे प्रसिद्धीमाध्‍यमांनी बातम्‍या प्रसिद्ध करतांना शहानिशा करून घ्‍यावी. नाही तर तोंडावर पडायला होते.

‘अंनिस’ने दिलेले चमत्‍काराचे आवाहन मी स्‍वीकारतो ! – अतुल छाजेड, ज्‍योतिषाचार्य

अंनिसला चपराक ! अंनिसला याविषयी काय म्‍हणायचे आहे ?

जिवे मारण्याची धमकी देणार्‍या पुणे येथील तरुणाला अटक !

(म्हणे) ‘धमकी देणार्‍यांमध्ये ‘सनातन प्रभात’सारखे लोक असू शकतात !’ शाम मानव यांनी तोडले अकलेचे तारे !

(म्हणे) ‘न्यायालयानेच कायदा लागू होतो कि नाही, यावर निर्णय द्यावा !’- शाम मानव, अंनिस  

पोलीस दल हा शासनाचाच एक भाग आहे आणि पोलिसांनी अभ्यासाअंती निर्णय घोषित करूनही त्याला विरोध करणे म्हणजे पोलिसांवर अविश्वास दाखवण्यासारखे आहे. हिंदु धर्म आणि संत यांना लक्ष्य करणे, ही अंनिसची रीतच असल्याने शाम मानव यांच्याकडून कोणती वेगळी अपेक्षा करणार ?

बागेश्‍वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्‍ण शास्‍त्री महाराज यांना नागपूर पोलिसांची ‘क्‍लिनचिट’ !

महाराजांच्‍या कार्यक्रमात अंधश्रद्धा मानता येईल, असे काहीही घडलेले नाही ! – पोलिसांचा निष्‍कर्ष

चमत्‍कारांच्‍या दिखाव्‍यातून हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या ख्रिस्‍ती पाद्य्रांना अंनिसवाल्‍यांचा विरोध का नाही ? – आचार्य महामंडलेश्‍वर श्री महंत सुधीरदास महाराज

केवळ हिंदु धर्माला लक्ष्य करणारे अंनिसवाले इतर धर्मांतील अंधश्रद्धांविषयी बोलण्‍याचे धाडस करतील का ?

जिवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर अंनिसचे शाम मानव यांच्या सुरक्षेत वाढ !

‘बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री महाराज यांच्याविरुद्ध बोलणे थांबवले नाही, तर तुमचा नरेंद्र दाभोलकर करू’, अशी धमकी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक शाम मानव यांना २३ जानेवारी या दिवशी दूरभाषद्वारे देण्यात आली आहे.

(म्‍हणे) ‘…तर मी धीरेंद्रकृष्‍ण शास्‍त्री महाराजांच्‍या पायावर डोके ठेवून क्षमा मागीन !’ – शाम मानव

पंडित धीरेंद्रकृष्‍ण शास्‍त्री महाराजांनी दिलेले आव्‍हान शाम मानव यांनी का स्‍वीकारले नाही ? याचे उत्तर त्‍यांनी प्रथम द्यावे !

नागपूर येथे धीरेंद्रकृष्ण शास्त्री महाराजांच्या समर्थनार्थ आणि अंनिसच्या विरोधात विहिंपचे आंदोलन !

अंधश्रद्धा निर्मूलन समितीने बागेश्‍वर धामचे कथावाचक पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांचा दैवी दरबार आणि दिव्यशक्ती याला आक्षेप घेतल्याप्रकरणी २० जानेवारी या दिवशी दुपारी २.३० वाजता संविधान चौक येथे विश्‍व हिंदु परिषदेच्या वतीने महाराजांच्या समर्थनार्थ आणि अंनिसच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले.

पंडित धीरेंद्रकृष्‍ण शास्‍त्री महाराज यांनी  शाम मानव यांचे आव्‍हान स्‍वीकारले !

बागेश्‍वर धामचे कथावाचक पंडित धीरेंद्रकृष्‍ण शास्‍त्री महाराज यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्‍थापक शाम मानव यांनी दिलेले आव्‍हान स्‍वीकारले आहे; मात्र समितीचे ३० लाख रुपयांचे पारितोषिक त्‍यांनी नाकारले आहे. मानव यांच्‍या सर्व प्रश्‍नांची विनामूल्‍य उत्तरे देण्‍यात येतील.