कार्यक्रमाच्या विरोधात अंनिसकडून तक्रार प्रविष्ट !

  • बागेश्वर धामचे सरकार पंडित धीरेंद्र शास्त्री महाराज यांचा मीरा रोड येथे कार्यक्रम
  • कार्यक्रम थांबवण्याची मागणी
पंडित धीरेंद्र शास्त्री महाराज

मुंबई – बागेश्वर धामचे सरकार पंडित धीरेंद्र शास्त्री महाराज यांचा मीरा रोड येथे कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला अंनिसचा आक्षेप असून त्यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली असून कार्यक्रम थांबवण्याची मागणीही केली आहे. हा कार्यक्रम १८ आणि १९ मार्च या दिवशी होणार आहे.