सीबीआय चौकशीसाठी राज्यांची अनुमती घेणे आवश्यक !  – सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नवी देहली – केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआयच्या) चौकशीसाठी संबंधित राज्याकडून अनुमती घेणे बंधनकारक आहे, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाने म्हटले की, ही तरतूद घटनेच्या संघराज्य या वर्णनाशी संबंधित आहे. देहलीतील विशेष पोलीस स्थापना अधिनियमात अधिकार क्षेत्रासाठी सीबीआयसाठी राज्य सरकारची अनुमती घेणे आवश्यक आहे.

सीबीआयच्या अधिकार क्षेत्राविषयी अनेकदा राज्यांकडून प्रश्‍न उपस्थित करण्यात येतात. बंगाल, राजस्थान, महाराष्ट्र आणि केरळ या राज्यांनी चौकशी करण्यापूर्वी सरकारची अनुमती घेण्याचे घोषित केले आहे.