भाजपकडून ५०० ख्रिस्ती, तर ११२ मुसलमानांना उमेदवारी

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या उमेदवारांसाठी प्रचार करणार आहेत. केरळमध्ये मुसलमान आणि ख्रिस्ती यांची एकत्रित लोकसंख्या ४५ टक्के आहे, तर हिंदू ५५ टक्के आहेत.

योगी आदित्यनाथ निवासाला असलेल्या हॉटेलच्या बाहेर राष्ट्रवादी काँग्रेसकडून घोषणाबाजी

आंदोलकांनी काळे झेंडे फडकवून योगी आदित्यनाथ यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.

हप्तेखोरीच्या संभाषणाची ध्वनिफीत समोर आल्याने पोलीस अधिकारी अडचणीत !

जनतेचे रक्षकच बनले भक्षक ! लाचखोरीच्या प्रकरणात अडकलेले पोलीस जनतेला कायद्याचे काय मार्गदर्शन करणार ? अशा लाचखोर पोलिसांवर तात्काळ आणि कठोर कारवाई झाली पाहिजे !

महाराष्ट्रात गेल्या ७ मासांत अनुमाने २९ कोटी लिटर मद्याची विक्री

राज्यात देशी आणि विदेशी मद्य, तसेच वाईनची विक्री गत ३ मासांपासून पूर्ववत् झाली आहे. गत ७ मासांत अनुमाने २९ कोटी लिटर मद्याची विक्री झाली आहे. मद्य विक्रीतून मिळणार्‍या महसुलाचे चालू आर्थिक वर्षातील वार्षिक उद्दिष्ट १९ सहस्र २२५ कोटी रुपयांचे आहे.

आंतरराष्ट्रीय आतंकवादी दाऊद इब्राहिम याच्या लोटे (तालुका खेड) येथील मालमत्तेचा लिलाव

आंतरराष्ट्रीय आतंकवादी दाऊद इब्राहिम कासकर याच्या लोटे येथील मालमत्तेचा लिलाव तालुक्यातील घाणेखुंट येथील रवींद्र काते यांनी १ कोटी १० लाख रुपयांची बोली लावून जिंकला.

विवाह कार्यासाठी ग्रामपंचायत, नगरपालिका आणि पोलीस यांची अनुमती बंधनकारक ! – प्रशासनाचा निर्णय

येत्या जानेवारी, फेब्रुवारी मध्ये कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर पालिका आणि जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. विवाह कार्यासाठी ग्रामपंचायत, नगरपालिका आणि पोलीस यांची अनुमती बंधनकारक करण्यात आली आहे.

ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या दूर केल्या जातील ! – दीपक वायंगणकर, उपजिल्हाधिकारी

ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या दूर करून ज्येष्ठ नागरिकांना सर्वतोपरी समाधान देण्याचा आणि सहकार्य करण्याचा प्रयत्न शासकीय यंत्रणेमार्फत केला जाईल – डिचोलीचे उपजिल्हाधिकारी दीपक वायंगणकर

जुने गोवेचा काही भाग ‘ग्रेटर पणजी’त समाविष्ट करण्याचा प्रस्ताव रहित ! – बाबू कवळेकर, उपमुख्यमंत्री

‘ग्रेटर पणजी नियोजन आणि विकास प्राधिकरण’च्या अंतर्गत जुने गोवे पंचायत क्षेत्रातील आणखी काही भाग ‘ग्रेटर पणजी नियोजन आणि विकास प्राधीकरण’च्या अंतर्गत आणण्याचा प्रस्ताव नगरनियोजन विभागाने रहित केला आहे.

कर्नाटकच्या माजी मंत्र्यांचे अपहरण आणि सुटका  

माजी मंत्री वार्थुर प्रकाश यांचे अपहरण केले होते मात्र दुसर्‍या दिवशी त्यांची सुटका केली. या अपहरणामागील नेमके कारण समजू शकलेले नाही.

कोकण रेल्वेमार्गावर ४ डिसेंबरपासून २ अतीजलद गाड्या धावणार

गाडीचे आरक्षण ९ डिसेंबरपासून चालू होणार आहे. जबलपूर-कोईम्बतूर स्पेशल गाडी ५ ते २६ डिसेंबरपर्यंत या कालावधीत धावणार आहे.