हप्तेखोरीच्या संभाषणाची ध्वनिफीत समोर आल्याने पोलीस अधिकारी अडचणीत !

जनतेचे रक्षकच बनले भक्षक ! लाचखोरीच्या प्रकरणात अडकलेले पोलीस जनतेला कायद्याचे काय मार्गदर्शन करणार ? अशा लाचखोर पोलिसांवर तात्काळ आणि कठोर कारवाई झाली पाहिजे !

अहमदनगर – नांदेडहून नगर येथे बदली झालेले अतिरिक्त पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड यांची अल्पकाळातच नगर येथूनही बदली करण्यात आली. याचे कारण हप्तेखोरीच्या संभाषणाची ध्वनिफीत आहे. ध्वनीफितीची पडताळणी करण्यासाठी राठोड यांच्या आवाजाचे नमुने घेण्यास न्यायालयाने मंजुरी दिली असल्याने राठोड यांच्या पुढील अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडून चालू असलेल्या राठोड यांच्या चौकशीला वेग प्राप्त होण्याचा अंदाज आहे.