विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन १४ आणि १५ डिसेंबरला मुंबईत होणार

विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन १४ आणि १५ डिसेंबर या दिवशी मुंबई येथे होणार आहे. ३ डिसेंबर या दिवशी झालेल्या विधीमंडळाच्या कामकाज समितीच्या बैठकीत हा निर्णय आला. कोरोनाच्या संसर्गामुळे अधिवेशन केवळ २ दिवस घेण्यात येत आहे.

संसर्गजन्य रोग प्रतिबंधक कायदा मागे घेण्याची मागणी करणार्‍या याचिकाकर्त्याला १ लाख रुपये अनामत रक्कम जमा करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्देश !

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात पुन्हा दळणवळण बंदी घोषित करण्यात येऊ नये, यासाठी संसर्गजन्य रोग प्रतिबंधक कायदा मागे घेण्यासाठीची मागणी अधिवक्ता हर्षल मिराशी यांनी मुंबई उच्च न्यायालयात केली आहे.

वस्त्यांची जातीवाचक नावे पालटण्याचा राज्यशासनाचा निर्णय !

राज्यातील वाड्या, वस्त्या आदींना असणारी जातीवाचक नावे पालटण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय २ डिसेंबरच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेतला. यामुळे आता कुंभारवाडा, तेलीआळी, सुतारवाडी आदी जातीवाचक नावे पालटण्यात येणार आहेत.

भाजपची विशेष राज्य कार्यकारिणी सभा ५ डिसेंबर या दिवशी बेळगावात

भारतीय जनता पक्षाची विशेष राज्य कार्यकारिणी सभा ५ डिसेंबर या दिवशी बेळगाव शहरात होत आहे.

जलयुक्त शिवार अभियानाची चौकशी करण्याचे काम सूडबुद्धीने ! – माजी मंत्री राम शिंदे, भाजप

सूडबुद्धी आणि आकसबुद्धीने जलयुक्त शिवार अभियानाची चौकशी करण्याचे काम हे महाविकास आघाडी सरकार करत आहे.

विकिपीडियाकडून भारताच्या मानचित्रातील ‘अक्साई चीन’ला चीनमध्ये दाखवले !

‘विकिपीडिया’ या संकेतस्थळावरील भारताच्या मानचित्रामध्ये अक्साई चीनला चीनच्या मानचित्रात दाखवल्याने भारत सरकारने आक्षेप घेत हे मानचित्र हटवण्याचा आदेश दिला आहे.

अन्नधान्याच्या संकटामुळे चीन अनेक वर्षांनंतर भारताकडून तांदूळ खरेदी करणार

चीनने विज्ञानामध्ये कितीही प्रगती केली, शेजारी देशांवर अतिक्रमण केले, तरी पोटाची भूक भागवण्यासाठी त्याचा वापर होऊ शकत नाही, हे आता त्याच्या लक्षात येईल, हीच अपेक्षा ! ३ दशकांत चीनने प्रथमच भारताकडून तांदळाची आयात करण्यास प्रारंभ केला आहे.

अशा गंभीर गुन्ह्यांच्या संदर्भात सरकार काही कृती करील, याची निश्‍चिती नसल्याने आता जनतेला पुढाकार घ्यावा लागेल !

ग्रामपंचायत कार्यालयातील टिपू सुलतानची प्रतिमा गावातील वाढता विरोध पहाता ही प्रतिमा कार्यालयातून काढण्यात आली होती; मात्र धर्मांधांनी पुन्हा आक्रमकपणे ग्रामपंचायत कार्यालयात येऊन धमक्या देत त्यांच्याशी वाद घातला.

आसाम सरकार ‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी कायदा करत आहे ! – अर्थमंत्री हिमंत बिस्वा सरमा

केंद्रातील भाजप सरकारने संपूर्ण देशासाठी लव्ह जिहादविरोधी कायदा बनवावा, असेच हिंदूंना वाटते !

हासन (कर्नाटक) येथे पोलिसांच्या उपस्थितीत महिला पत्रकारावर धर्मांध कसायांचे आक्रमण

महिला पत्रकाराने घटनास्थळी जाऊन अवैध पशूवधगृह उघडण्याची मागणी केल्यावर येथे जमलेल्या धर्मांधांनी त्यांच्यावर आक्रमण केले.