घाणेखुंट (तालुका खेड) येथील रवींद्र काते यांनी १ कोटी १० लाख रुपयांची बोली लावून लिलाव जिंकला

खेड – आंतरराष्ट्रीय आतंकवादी दाऊद इब्राहिम कासकर याच्या लोटे येथील मालमत्तेचा लिलाव तालुक्यातील घाणेखुंट येथील रवींद्र काते यांनी १ कोटी १० लाख रुपयांची बोली लावून जिंकला. ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे झालेल्या या लिलावप्रक्रियेत देहली येथील अधिवक्ता भुपेंद्रकुमार भारद्वाज आणि घाणेखुंट येथील रवींद्र काते यांनी सहभाग नोंदवला होता.
रत्नागिरी जिल्ह्यात दाऊद इब्राहिम याच्या ७ वेगवेगळ्या मालमत्तांचा केंद्रशासनाच्या वित्त मंत्रालयाकडून लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार दाऊद याच्या मूळगावी म्हणजेच तालुक्यातील मुंबके येथे असलेल्या बंगल्याचा लिलाव १० नोव्हेंबर या दिवशी ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे करण्यात आला होता; मात्र तालुक्यातील लोटे येथील १५०, १५१, १५२, १५३ आणि १५५ या क्रमांकाच्या भूखंडाचा लिलाव काही कारणास्तव करण्यात आला नव्हता. या भूखंडाचे राखीव मूल्य ६१ लाख ४८ सहस्र १०० रुपये निश्चित करण्यात आले होते.
मालमत्ता नोंदणीसह ‘जलमेट्रो’ला गती आणि ३१ ऑगस्टपासून विधानसभा अधिवेशन
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
राज्यातील ४२३ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तेचे केले जाणार मुद्रीकरण !
थोडक्यात महत्त्वाचे (२३.०७.२०२६)
रावेत-नर्हे ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’च्या ‘डी.पी.आर्.’ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मान्यता !
संत मुक्ताई पालखीचे ७०० किलोमीटर प्रवास करून मोहोळ (जिल्हा सोलापूर) तालुक्यात आगमन !