भाजपकडून ५०० ख्रिस्ती, तर ११२ मुसलमानांना उमेदवारी

  • केरळ स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक

  • अमित शहा आणि योगी आदित्यनाथ प्रचार करणार

हे उमेदवार निवडून आले, तर हिंदुत्वाची बाजू घेतील; लव्ह जिहाद, धर्मांतर यांना विरोध करतील; समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा आदींचे समर्थन करतील, अशी अपेक्षा !

तिरुवनंथपूरम् (केरळ) – केरळमधील पंचायत निवडणुकीत भाजपने तब्बल ५०० ख्रिस्त्यांना, तर ११२ मुसलमानांना उमेदवारी दिली आहे. केरळमध्ये ८, १० आणि १४ डिसेंबरला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या उमेदवारांसाठी प्रचार करणार आहेत. केरळमध्ये मुसलमान आणि ख्रिस्ती यांची एकत्रित लोकसंख्या ४५ टक्के आहे, तर हिंदू ५५ टक्के आहेत. केरळमध्ये विधानसभा निवडणुकीला अजून ६ मास अवकाश आहे.