पुणे – राज्यात देशी आणि विदेशी मद्य, तसेच वाईनची विक्री गत ३ मासांपासून पूर्ववत् झाली आहे. गत ७ मासांत अनुमाने २९ कोटी लिटर मद्याची विक्री झाली आहे. मद्य विक्रीतून मिळणार्या महसुलाचे चालू आर्थिक वर्षातील वार्षिक उद्दिष्ट १९ सहस्र २२५ कोटी रुपयांचे आहे. यापैकी ३० नोव्हेंबर पर्यंत ७ सहस्र ८०७ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. वार्षिक उद्दिष्टाच्या ४०.६१ टक्के महसूल मिळाला आहे. गेल्या आर्थिक वर्षात हेच उद्दिष्ट १७ सहस्र ९७७ कोटी रुपयांचे होते, असे महाराष्ट्र राज्याचे उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी सांगितले. (मद्यविक्रीसाठी असे उद्दिष्ट देणे म्हणजेच जनतेला एकप्रकारे व्यसनी बनवण्यासाठी प्रोत्साहन देण्यासारखे नव्हे का ? – संपादक)