मुख्यमंत्र्यांच्या आश्‍वासनानंतर ‘मये भूविमोचन समिती’चे धरणे आंदोलन मागे

मये स्थलांतरित संपत्तीच्या प्रश्‍नी कायद्यात आवश्यक पालट करून सनद देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिल्यावर धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील अनेक पदे रिक्त ठेवून राज्य सरकार आकसाने वागत आहे ! – रणजित देसाई, गटनेते, सिंधुदुर्ग जिल्हा परिषद

सिंधुदुर्ग – गुणवत्तेत प्रथम क्रमांकावर असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील अधिकारी वर्गाची अनेक पदे वर्षभरापासून रिक्त आहेत.

रा.स्व. संघाचे मा.गो. वैद्य यांच्या निधनाविषयी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडून शोक व्यक्त

‘‘संघ परिवारासाठी मा.गो. वैद्य यांचे योगदान उल्लेखनीय आहे. राष्ट्र उभारणीतील त्यांचे अतुल कार्य सदैव स्मरणार्थ राहील.’’

राष्ट्रीय स्मारकांना भेट देणार्‍यांच्या संख्येवरील मर्यादा हटवली

पणजी – पुरातत्व विभागाने राष्ट्रीय स्मारकांना भेट देणार्‍यांच्या संख्येवरील मर्यादा हटवली आहे.

हानीभरपाई न दिल्यास धरणे आंदोलन छेडण्याची ऊस उत्पादकांची चेतावणी

धारबांदोडा येथील साखर कारखाना बंद असल्याने ऊस उत्पादकांना मोठी हानी सोसावी लागत आहे.

पुणे येथे ‘प्लाझ्मा’ बॅगच्या किमतींमध्ये तफावत !

आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने त्याचा त्रास रुग्णांना होतोे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन रुग्णांची होणारी आर्थिक फसवणूक टाळावी !

ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्‍वर यांची यात्रा प्रतिकात्मक स्वरूपात साजरी होणार !

ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्‍वर यात्रेला १० जानेवारीपासून प्रारंभ होणार आहे. यंदा कोरोनामुळे कार्तिकी वारीच्या धर्तीवर श्री सिद्धरामेश्‍वरांची यात्राही प्रतिकात्मक स्वरूपात पार पाडावी, असा अभिप्राय पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्त यांनी दिला आहे.

किल्ले अजिंक्यतारा येथे १२ जानेवारी या दिवशी होणार सातारा नगरपालिकेची विशेष सभा

छत्रपती शाहू महाराज यांचा राज्याभिषेकदिन म्हणजे १२ जानेवारी हा दिवस. वर्षीपासून प्रत्येक १२ जानेवारीला सातारा नगरपालिकेची विशेष सभा किल्ले अजिंक्यतारा येथील राजसदरेवर घेण्याची घोषणा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली आहे.

पूरग्रस्तांच्या साहाय्यासाठी गुरुवायूर मंदिराकडून घेतलेले १० कोटी रुपये परत द्या !

केवळ पैसेच परत घेऊ नयेत, तर असा निर्णय घेणार्‍यांना न्यायालयाने दंड ठोठावला पाहिजे. जर यापूर्वीही अशा प्रकारे मंदिराचे पैसे सामाजिक कार्यासाठी वापरले गेले असतील, तर तेही परत घेण्यासाठी हिंदूंनी मागणी केली पाहिजे !

सत्ताधारी माकपच्या कार्यकर्त्यांकडून मंदिरात तोडफोड, देवतांच्या मूर्तींचा अवमान आणि चोरी

केरळमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या विजयाचा उन्माद ! अशी गुंडगिरी करणारे माकपवाले म्हणे पुरो(अधो)गामी आणि सहिष्णु ! अशा घटनांविषयी एकही पुरो(अधो)गामी किंवा निधर्मीवादी तोंड उघडत नाही, हे लक्षात घ्या !