कुणीतरी खोडसाळपणाने ई-मेल पाठवल्याचा पोलिसांचा अंदाज !
पिंपरी – बावधनजवळील सूस रोड येथील एका खासगी शाळेत बॉंब ठेवल्याचा ई-मेल १३ फेब्रुवारी या दिवशी सकाळी शाळेच्या मुख्याध्यापिकेला प्राप्त झाला. या विषयी मुख्याध्यापिकेने पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिल्यानंतर स्थानिक पोलीस आणि बॉंब शोधक अन् नाशक पथक घटनास्थळी आले. सर्व शाळेची पडताळणी करण्यात आली; मात्र काहीही न आढळल्याने हा कुणीतरी खोडसाळपणा केला असावा, असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. तरी हा ई-मेल कुणी पाठवला ? कुठून आला ? याविषयीचे अन्वेषण चालू असल्याचे पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी सांगितले. ‘घाबरून जाऊ नये’, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.