झाराप झिरो पॉईंट येथे चहा बदलून न दिल्याच्या वादातून पर्यटकाला शेख कुटुंबियांकडून अमानुष मारहाण

  • पोलिसांची त्वरित कारवाई

  • ६ जणांवर गुन्हा नोंद

प्रतिकात्मक छायाचित्र

कुडाळ – ‘चहात माशी पडल्याने तो चहा बदलून द्यावा, अन्यथा पैसे देणार नाही’, असे सांगितल्याच्या रागातून रूपेश बबन सपकाळ (वय ३३ वर्षे) या कात्रज, पुणे येथील पर्यटकाला कपडे फाटेपर्यंत काठीने मारहाण करून हातपाय बांधून ठेवण्यात आले. ही घटना ६ फेब्रुवारीला सकाळी ६ वाजता झाराप झिरो पॉईंट येथे घडली असून या प्रकरणी खान मोहल्ला, झाराप येथील ६ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. बांधलेल्या अवस्थेतील पर्यटकाला पोलिसांच्या उपस्थितीत सोडवण्यात आले असून बांधलेल्या पर्यटकाची स्थिती अंगावर शहारे उभे रहाण्यासारखीच आहे.

झाराप झिरो पॉईंट येथे रूपेश बबन सपकाळ आणि त्यांचे मित्र सकाळी ६ वाजता तनवीर करामत शेख यांच्या हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी थांबले होते. या वेळी चहाच्या कपात माशी पडली म्हणून रूपेश सपकाळ यांनी चहा बदलून मागितला. तो बदलून न दिल्यामुळे चहाचे पैसे देणार नाही, असे सपकाळ यांनी तनवीर करामत शेख याला सांगितले. त्याचा राग येऊन त्याच्यासह शराफत अब्बास शेख, अब्बास उपाख्य साहिल शराफत शेख, परवीन शराफत शेख, साजमीन शराफत शेख आणि तलाह करामत शेख, अशा सर्वांनी मिळून रूपेश सपकाळ यांना काठीने मारहाण केली, तसेच रूपेश सपकाळ याचा मित्र संजय सुदाम चव्हाण यालाही मारहाण केली. (अल्पसंख्य असूनही गुन्हेगारीत बहुसंख्य असलेले मुसलमान ! – संपादक) रूपेश सपकाळ यांचे कपडे फाडून त्यांचे हातपाय दोरीने बांधून ठेवले. या घटनेनंतर तेथील एका व्यक्तीने पोलिसांना माहिती दिली. यानंतर कुडाळ पोलीस ठाण्याच्या साहाय्यक पोलीस निरीक्षक ममता जाधव, पोलीस योगेश मुंढे यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. तोपर्यंत तो पर्यटक हातपाय बांधलेल्या स्थितीत होता. त्याचे दोन्ही हात
मागे बांधलेले होते, तसेच पायही उलटे दुमडून बांधण्यात आले होते. पोलिसांनी घटनास्थळी पोचताच त्याला बांधलेल्या अवस्थेतून मुक्त केले. या संदर्भात संबंधितांची तक्रार नसली, तरी कुडाळ पोलिसांनी घटनास्थळावरील परिस्थिती पाहून स्वतः तक्रारदार होऊन तक्रार प्रविष्ट (दाखल) करत एकूण ६ जणांवर गुन्हा नोंद केला.