अपहृत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार आणि तिची हत्या करणार्‍या आरोपीला अटक !

अशा वासनांधांना आजन्म कारागृहात डांबण्याची शिक्षा द्यायला हवी, त्याविना अशा घटनांना आळा बसणार नाही ! जामीन मिळाल्यास असे नराधम आणखी किती मुलींची हत्या करतील, याचा नेम नाही !

देशात फाशीची शिक्षा देणे चालूच ठेवणार ! – नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प

मी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेताच न्याय विभागाला बलात्कारी, खुनी आणि रानटी लोकांपासून अमेरिकी कुटुंबांचे संरक्षण करण्यासाठी गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देत रहाण्याचे आदेश देईन.

आचरा येथील समुद्रात अवैधरित्या मासेमारी करणार्‍या कर्नाटक येथील नौकेवर कारवाई !

मालवण तालुक्यातील आचरा समुद्रात १७ वाव सागरी अंतरात अवैधरित्या मासेमारी करणारी मलपी, कर्नाटक येथील एक यांत्रिक मासेमारी नौका मत्स्य व्यवसाय विभागाच्या देवगड कार्यालयाच्या गस्तीनौकेने पाठलाग करून पकडली; मात्र अन्य परप्रांतीय मासेमार त्यांच्या नौका घेऊन पसार झाले.

थोडक्यात महत्त्वाचे : आजपासून पंडित धीरेंद्रशास्त्री महाराज यांच्या हनुमंत कथेला प्रारंभ !…

जळगाव येथील धरणगाव येथील तालुक्यातील झुरखेडा येथे बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रशास्त्री महाराज यांच्या हनुमंत कथेला प्रारंभ होणार आहे. २६ ते ३० डिसेंबर असे ५ दिवस कथेचे आयोजन करण्यात येणार आहे.

झारखंडमध्ये बांगलादेशी मुसलमानांची घुसखोरी चालूच !

झारखंडमध्ये मुसलमानांचे लांगूलचालन करणारे झारखंड मुक्ती मोर्चाचे सरकार सत्तेत असल्यामुळे आणखी वेगळे काय होणार ?

गोव्यात ३ खनिज क्षेत्रांत खनिज उत्खननास ‘एस्.ई.आय्.ए.ए.’ची मान्यता

‘राज्य पर्यावरण परिणाम मूल्यांकन प्राधिकरणा’ने (‘एस्.ई.आय्.ए.ए.’ने  -‘द स्टेट एन्व्हार्यर्न्मेंट इम्पेट असेसमेंट अथॉरिटी’ने) कुडणे-करमळी खाण ब्लॉक-६, कुडणे खाण ब्लॉक-७ आणि थिवी, पिर्ण खाण ब्लॉक-८ यांना खाण व्यवसाय चालू करण्यास अनुमती दिली आहे.

मंदिरातील घंटा चोरी प्रकरणी एका अल्पवयीन मुलाला अटक !

सुपे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंदिरातील पितळ धातूच्या समई आणि घंटा चोरणार्‍या एका अल्पवयीन मुलाला सुपे पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ३१ सहस्र ५०० रुपयांच्या ११ घंटा कह्यात घेतल्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

AIMIM Nominated Accused Of Delhi Riots : देहली दंगलीतील आरोपी शाहरुख पठाण याला विधानसभेत उमेदवारी देण्याचा ए.आय.एम्.आय.एम्.चा प्रयत्न !

एका पोलीस हवालदाराला पिस्तूल दाखवून धमकावणार्‍याला उमेदवारी देण्याचा प्रयत्न करणार्‍या पक्षाची मानसिकता यातून स्पष्ट होते ! अशा पक्षांवर बंदी घालण्याची मागणी हिंदु संघटनांनी करणे आवश्यक आहे !

खा. शरद पवार यांच्याकडून स्व. अभयसिंहराजे भोसले यांच्यावर अन्याय ! – शिवेंद्रसिंहराजे भोसले

स्व. अभयसिंहराजे भोसले यांचे नेतृत्व महाराष्ट्राने पाहिले होते. वर्ष १९९९ मध्ये स्व. भोसले काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले नसते, तर कदाचित काँग्रेसने त्यांना मुख्यमंत्रीपदी बसवले असते.

वाहतूककोंडीतून सुटका मिळवण्यासाठी मुंबईत केबल टॅक्सीचा प्रस्ताव ! – प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री

मुंबईकरांची वाहतूककोंडीतून सुटका करण्यासाठी मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात केबल टॅक्सी (केबलद्वारे वाहतूक करणारे वाहन) चालवण्याचा प्रस्ताव परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी मांडला. पदभार सांभाळल्यानंतर त्यांनी हीच पहिली घोषणा केली.