नवनीत राणा यांना धमकीचे पत्र !

त्यांच्या घरासमोर गाय कापण्याची  धमकीही त्याने या पत्रात दिली आहे. एवढेच नव्हे, तर १० कोटी रुपये खंडणीही या पत्रात मागितली आहे आणि ‘ती दिल्यास पाठ सोडू’ अशी धमकीही दिली आहे.

भारत शत्रूराष्‍ट्रांवर लक्ष ठेवण्‍यासाठी ५२ उपग्रह प्रक्षेपित करणार !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या अध्‍यक्षतेखालील सुरक्षाविषयक मंत्रीमंडळ समितीने अंतराळावरून शत्रूराष्‍ट्रांवर पाळत ठेवण्‍याच्‍या प्रकल्‍पाच्‍या तिसर्‍या टप्‍प्‍याला संमती दिली.

भाषाभवनाच्या माध्यमातून मराठी समृद्ध आणि प्रगल्भ करूया ! – मुख्यमंत्री

मराठी भाषेचे संवर्धन आणि विकास यांसाठी होणारे मराठी भाषाभवन उत्तम अन् दर्जेदार व्हावे, भाषाभवनाच्या माध्यमातून मराठी अधिक समृद्ध आणि प्रगल्भ करण्यासाठी अधिक जोमाने काम करूया, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

मुलीच्या आत्महत्येनंतर वडिलांकडून तिला त्रास देणार्‍या आरोपींचा शोध !

आरोपींचा शोध घेण्यासाठी नागरिकांना खस्ता खाव्या लागत असतील, तर पोलीस प्रशासन हवेच कशाला ?

निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून योजना लागू केल्याचा आरोप !

ज्येष्ठ पत्रकार, लेखक आणि राजकीय विश्लेषक विनय हर्डीकर यांनी अधिवक्ता असीम सरोदे यांच्या वतीने ही नोटीस पाठवली आहे.

हिंदुत्वांविषयी अभिमान निर्माण करण्याचे रा.स्व. संघाचे कार्य मोठे ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

समाजामध्ये राष्ट्रीयत्व आणि हिंदुत्व यांविषयी अभिमान निर्माण करण्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य मोठे आहे, असे गौरवोद्गार मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काढले.

प्रदूषण करणार्‍या आस्थापनाचे वीज आणि पाणी बंद करण्याचा आदेश !

नियमांचे उल्लंघन करणार्‍या आस्थापनावर कठोर कारवाई करून त्याचा उत्पादन करण्याचा परवानाच रहित केल्यास नियम पाळले जातील. नियम पाळण्यासाठी नसून उल्लंघन करण्यासाठीच बनवले असल्याची मानसिकता यामुळे ठेचली जाईल !

जळगाव येथे विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन !

महाराष्ट्र, तसेच संपूर्ण देशात स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या असून त्याला शाळकरी मुलीही अपवाद राहिलेल्या नाहीत. महिला वर्गास बळ देण्यासाठी, त्यांना स्वसंरक्षण करता यावे, यासाठी विजयादशमीच्या निमित्ताने जळगाव शहरात प्रथमच रणरागिणी शस्त्रपूजनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात पार पडला महामृत्यूंजय याग !

सप्तर्षींच्या आज्ञेने येथील सनातनच्या आश्रमात दसर्‍याच्या दिवशी म्हणजेच १२ ऑक्टोबर या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या यांचे आरोग्य चांगले रहावे आणि त्यांना दीर्घायुष्य प्राप्त व्हावे, यासाठी महामृत्यूंजय याग  करण्यात आला.

श्री तिरुपती देवस्थानच्या प्रसादात भेसळ करणार्‍या गुन्हेगारांना त्वरित अटक करा !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने बिहार आणि उत्तरप्रदेश येथील जिल्हा दंडाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली मागणी !