हिंदु जनजागृती समितीच्या वतीने बिहार आणि उत्तरप्रदेश येथील जिल्हा दंडाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली मागणी !
वाराणसी (उत्तरप्रदेश) – जगभरातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री तिरुपती बालाजी मंदिराच्या प्रसादाच्या लाडवांमध्ये प्राण्यांच्या चरबीचे तेल मिसळले जात असल्याची अत्यंत गंभीर गोष्ट नुकतीच उघडकीस आणली. त्यामुळे जगभरातील हिंदु आणि बालाजीभक्त यांच्यामध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. ‘प्रसादात प्राण्यांच्या चरबीचे तेल मिसळणे, ही केवळ भेसळ नाही, तर हिंदूंच्या धार्मिक श्रद्धेवर जाणीवपूर्वक केलेले आक्रमण आहे. त्यामुळे धार्मिक भावना दुखावणार्यांवर गुन्हा नोंदवून त्यांना तात्काळ अटक करावी, तसेच माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी आणि त्यांचे वडील दिवंगत सॅम्युअल राजशेखर रेड्डी यांच्या कार्यकाळातील तिरुपती मंदिराशी संबंधित सर्व निर्णयांची सखोल चौकशी करावी, तसेच हिंदु धर्माच्या विरोधात घेतलेले निर्णय तात्काळ रहित करावेत’, अशी मागणी करणारे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तरप्रदेशातील वाराणसी, गाझीपूर आणि बिहारच्या मुझफ्फरपूर येथे जिल्हा दंडाधिकार्यांकडे देण्यात आल. (अशी मागणी का करावी लागते ? पोलीस स्वतःहून गुन्हा नोंदवून कारवाई का करत नाहीत ? – संपादक) हे निवेदन केंद्रीय अन्नमंत्री प्रल्हाद जोशी आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या नावे देण्यात आले.