विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची महाराष्ट्र सरकारला सूचना !
नागपूर – राज्यघटनेनुसार भारत ‘धर्मनिरपेक्ष देश’ आहे. सद्य:स्थितीत मात्र सरकारने केवळ एका समाजाची म्हणजे हिंदूंचीच धार्मिक स्थळे नियंत्रणात घेतली आहेत. कायदा सर्वांना समान असावा. त्यामुळे केवळ हिंदूंचीच नव्हे, तर अन्य धर्मियांची धार्मिक स्थळेही नियंत्रणात आणण्याविषयी सरकारने विचार करावा, अशी सूचना विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. १७ डिसेंबर या दिवशी ‘श्रीसिद्धिविनायक गणपति मंदिर विश्वस्त व्यवस्था (प्रभादेवी) अधिनियम, १९८०’ सुधारणा विधेयक विधानसभेत संमत करतांना अध्यक्ष नार्वेकर यांनी सरकारला वरील सूचना दिली.
अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, ‘‘व्यवस्थापन योग्य व्हावे, यासाठी मंदिरे सरकारच्या नियंत्रणात आणण्यात आली आहेत. हा नियम सर्व धर्मियांसाठी लागू असायला हवा. सध्या मात्र हा नियम केवळ हिंदूंसाठी लागू करून केवळ हिंदूंचीच धार्मिक स्थळे कह्यात घेण्यात आल्याविषयी समाजात विचारणा केली जात आहे. याविषयी सरकारने विचार करावा.’’
संपादकीय भूमिका
|