पिंपरी-चिंचवड – टवाळखोरांच्या त्रासाला कंटाळून ५ महिन्यांपूर्वी भोसरी येथे १२ वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलीच्या वडिलांनी सीसीटीव्हीच्या आधारे माहिती काढून आरोपीचा शोध घेतला. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. पोलिसांनी कारवाई करत क्षितिज पराड आणि तेजस पठारे यांना कह्यात घेतले. (पोलीस यंत्रणांचा धाक संपल्यामुळे टवाळखोरांवर पोलिसांचा वचक राहिला नसल्याने अशा घटना घडत आहेत. – संपादक)
संपादकीय भूमिका :आरोपींचा शोध घेण्यासाठी नागरिकांना खस्ता खाव्या लागत असतील, तर पोलीस प्रशासन हवेच कशाला ? |