सातारा येथे विसर्जन मिरवणुकीत प्लाझमा, बीम आणि लेझर लाईट यांना प्रतिबंध !

प्रतीकात्मक छायाचित्र

सातारा, १४ सप्टेंबर (वार्ता.) – प्लाझमा, बीम आणि लेझर बीम लाईट यांच्या उपयोगास श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीमध्ये प्रतिबंध आहे. या आदेशाचे उल्लंघन करणार्‍या संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले आहे. श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या आणि मिरवणूक पहाण्यास आलेल्या भक्तांच्या डोळ्याला इजा होऊन त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी हे आदेश दिले आहेत.

या आदेशानुसार सातारा जिल्ह्यामध्ये १२ ते १८ सप्टेंबरच्या रात्री १२ वाजेपर्यंत श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूक, तसेच इतर कार्यक्रमांमध्ये कोणत्याही व्यक्तीने, गणेशोत्सव मंडळ किंवा कार्यक्रम आयोजक यांनी प्लाझमा, बिम लाईट आणि लेझर बिम लाईटचा उपयोग करू नये. यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ मधील कलम १६३ अन्वये उपयोगास प्रतिबंध करण्यात आला आहे. , असे जिल्हाधिकारी डुडी यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.