मुंबईत दूध भेसळ करणार्‍यांवर कारवाई

प्रतीकात्मक छायाचित्र

मुंबई – गणेशोत्सवानिमित्त दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाने हाती घेतलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत मुंबईत करण्यात आलेल्या कारवाईत २८५ लिटर भेसळयुक्त दूध जप्त करून नष्ट करण्यात आले, तसेच या प्रकरणी दोघांविरोधात कारवाई करण्यात आली.

या धाडीमध्ये अमूल, गोकुळ, महानंद या दूध आस्थापनांच्या दुधामध्ये भेसळ करणारे सैदुल आगया दडपेली (३८) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून ७ सहस्र २२२ रुपये किमतीचे १२२ लिटर दूध जप्त करण्यात आले. श्रीनिवासुलू रामस्वामी बंडारू (५२) यांच्याकडून ९ सहस्र ८०६ रुपयांचे १६३ लिटर दूध जप्त करण्यात आले.

संपादकीय भूमिका 

अन्नामध्ये भेसळ करणार्‍यांवर कठोर कारवाई होत नसल्याने वारंवार गुन्हे घडतात !