मुलुंड (मुंबई) : महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्‍यावर वीजवाहिनी उघडी टाकल्‍यावरून गुन्‍हा नोंद

मुलुंड येथे एका ६ वर्षांच्‍या मुलाला उघड्या विद्युत्‌वाहिनीचा धक्‍का लागून त्‍याचा मृत्‍यू झाला होता. ९ महिन्‍यांच्‍या अन्‍वेषणानंतर या प्रकरणी मुलुंड पोलिसांनी महावितरणच्‍या २ अधिकार्‍यांसह एकूण ६ जणांवर गुन्‍हा नोंद केला आहे.

विहिंप-बजरंग दलाचे इचलकरंजीतील आपत्तीग्रस्‍त नागरिकांसाठी सेवाकार्य !

विश्‍व हिंदु परिषद-बजरंग दलाचे नैसर्गिक आपत्तीत अडकलेल्‍या इचलकरंजी येथील नागरिकांसाठी सेवाकार्य करण्‍यात येत आहे. पूरस्‍थितीमुळे स्‍थलांतरित झालेल्‍या नागरिकांना अन्‍न मिळण्‍यासाठी ‘केंद्रीय भोजनकक्ष’ चालू करण्‍यात आला आहे.

नवजात बाळाचा ‘स्‍मशान दाखला’ सिद्ध केल्‍याची यशवंतराव चव्‍हाण स्‍मृती रुग्‍णालयात घटना !

अशा दायित्‍वशून्‍य आधुनिक वैद्यांवर कठोर कारवाई होणे आवश्‍यक !

‘एस्.टी.’ची कोल्‍हापूर-मुंबई आणि कोल्‍हापूर-शिर्डी शयनयान बससेवा चालू !

‘एस्.टी.’च्‍या कोल्‍हापूर विभागासाठी ६ नवीन शयनयान (स्‍लीपर) गाड्या प्राप्‍त झाल्‍या आहेत. त्‍यांपैकी प्रतिदिन कोल्‍हापूर-बोरीवली (रात्री ८.३० वाजता), कोल्‍हापूर-मुंबई (रात्री ९.३० वाजता), तसेच कोल्‍हापूर-शिर्डी (रात्री ८ वाजता) या गाड्या चालू करण्‍यात आल्‍या आहेत.

दुसर्‍याशी प्रेमसंबंध असल्‍याच्‍या संशयातून प्रेयसीला दुसर्‍या मजल्‍यावरून ढकलल्‍याने तरुणीचा जागीच मृत्‍यू !

संयमाचा अभाव असणार्‍या तरुण पिढीला सक्षम करण्‍यासाठी त्‍यांना धर्मशिक्षण देणे आवश्‍यक आहे !

‘पोर्शे’ कार अपघात प्रकरणातील खटले जलदगती न्‍यायालयात चालवावेत ! – पुणे पोलीस आयुक्‍तांची मागणी

कल्‍याणीनगर येथील ‘पोर्शे’कार अपघात प्रकरणातील खटले जलदगती न्‍यायालयात चालवण्‍यात यावेत, अशी मागणी करणार असल्‍याची माहिती पुण्‍याचे पोलीस आयुक्‍त अमितेश कुमार यांनी दिली.

शिरोळ तालुक्यात (कोल्हापूर) पुराच्या पाण्यातून जाणारा ट्रॅक्टर उलटला !

बस्तवाड-आकीवाट मार्गावर ट्रॅक्टरमधून ७ जण नदीच्या पुलावर आलेअसता पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे ट्रॅक्टर वाहून जाऊ लागला. ट्रॅक्टरचालकाचा ताबा सुटल्याने तो नदीपात्रात उलटला.

हिंजवडीत (पुणे) पिस्तुलाचा धाक दाखवून ज्वेलर्सच्या दुकानात चोरी !

हिंजवडीमध्ये २ ऑगस्टला भर दिवसा पिस्तुलाचा धाक दाखवून ज्वेलर्सला लुटण्यात आले आहे. हिंजवडीमधील लक्ष्मी चौक या ठिकाणी असलेल्या ‘शिवमुद्रा ज्वेलर्स’ नावाच्या दुकानात ३ चोर शिरले…

सरकारने देवस्‍थानच्‍या वर्ग २ च्‍या इनामी भूमींच्‍या संदर्भात घेतलेल्‍या निर्णयाला मंदिर महासंघाचा तीव्र विरोध ! – सुनील घनवट, राज्‍य समन्‍वयक, महाराष्‍ट्र मंदिर महासंघ

सरकारचा प्रस्‍तावित निर्णय मंदिरांना कायमस्‍वरूपी आर्थिकदृष्‍ट्या दुर्बल करणारा असल्‍याने ‘महाराष्‍ट्र मंदिर महासंघा’चा या निर्णयाला तीव्र विरोध आहे.

जिहाद्यांच्या विरोधात कठोर कारवाई झालीच पाहिजे ! – ‘पतित पावन संघटने’ची मागणी

लव्ह जिहाद’मध्ये फसलेल्या ताईला न्याय मिळेल का ?’, ‘जिहाद्यांच्या विरोधात कठोर कारवाई झालीच पाहिजे !’, अशा घोषणा देत राज्यासह संपूर्ण भारतात जिहाद्यांकडून निष्पाप लोकांवर होत …