मुलुंड (मुंबई) येथील मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचे प्रकरण
मुंबई – घराबाहेर खेळत असतांना मुलुंड येथे एका ६ वर्षांच्या मुलाला उघड्या विद्युत्वाहिनीचा धक्का लागून त्याचा मृत्यू झाला होता. ९ महिन्यांच्या अन्वेषणानंतर या प्रकरणी मुलुंड पोलिसांनी महावितरणच्या २ अधिकार्यांसह एकूण ६ जणांवर गुन्हा नोंद केला आहे.
घराबाहेर खेळत असतांना त्याचा स्पर्श महावितरण आस्थापनाच्या उघड्या असलेल्या वीज वाहिनीला झाला. त्याला विजेचा जोरदार झटका लागून तो गंभीर घायाळ होऊन नंतर त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर महावितरणच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप करून मुलाच्या कुटुंबियांनी चौकशीची मागणी केली होती. महावितरणचे अधिकारी आणि स्थानिक रहिवासी यांच्या निष्काळजीपणामुळेच ही घटना घडल्याचे समोर आले.