मलकापूर (जिल्हा कोल्हापूर) येथे रणरागिणी समितीची स्थापना !

निळे येथील जोतिबा मंदिर येथे हिंदु जनजागृती समितीप्रणीत रणरागिणी समितीची शाखा स्थापन करण्यात आली. यात निळे आणि बाणेकरवाडी येथील धर्मशिक्षण वर्गांतील युवती अन् महिला यांचा पुढाकार होता. ग्रामदैवत जोतिबा देवाच्या चरणी श्रीफळ वाढवून प्रार्थना करण्यात आली.

पुणे येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा थाटात शुभारंभ !

पुणे येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रिडा संकुलामध्ये थाटात शुभारंभ झाला. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

अभिव्यक्तीस्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे ! – डॉ. संजय उपाध्ये, ज्येष्ठ प्रवचनकार

अभिव्यक्तीस्वातंत्र्यामुळे अनेक गोष्टींसाठी सवलत मिळाली आहे. त्याचा वापर करतांना विवेक आणि तारतम्य पाळायलाच हवे. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, याची जाणीव सर्वांनी ठेवली पाहिजे, असे मत ज्येष्ठ प्रवचनकार डॉ. संजय उपाध्ये यांनी व्यक्त केले.

…अन्यथा पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कामकाज बंद पाडू ! – बाबा कांबळे, अध्यक्ष, टपरी, हातगाडी पंचायत

वर्ष २०१३ च्या सर्वेक्षणानुसार शहरातील सर्व टपरी, पथारी आणि हातगाडीधारकांना १५ दिवसांमध्ये आचारसंहिता लागू होण्यापूर्वी परवाना द्या; अन्यथा पिंपरी-चिंचवड महापालिकेला टाळे ठोकून कामकाज बंद पाडू, अशी चेतावणी ‘टपरी, हातगाडी पंचायत’चे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी दिली आहे.

लोकलगाडीत प्रवाशांकडून वयस्कर तिकीट तपासनीसाला मारहाण !

तिकीट तपासनीसाला मारहाण होत असतांना अन्य प्रवाशांनी त्या प्रवासाला अडवले का नाही ? असे निष्क्रीय प्रवासी काय कामाचे ?

‘ससून’मधील आधुनिक वैद्यांच्या संपामुळे रुग्णांचे हाल !

कोलकाता येथील वैद्यकीय महाविद्यालयात निवासी महिला डॉक्टरची बलात्कार करून हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर डॉक्टरांच्या सुरक्षिततेच्या सूत्रावर देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांतील निवासी डॉक्टरांनी संप पुकारला आहे.

विद्यार्थिनींची नग्न छायाचित्रे सामाजिक माध्यमांवर प्रसारित करणार्‍या पुणे येथील दहावीच्या ३ विद्यार्थ्यांवर गुन्हा नोंद !

एवढ्या लहान वयात मुलांची अशी मानसिकता असेल, तर पुढे ही मुले कशी निपजतील ? याचा विचारच न केलेला बरा ! अशा विकृतांवर अंकुश ठेवण्यासाठी त्यांना धर्मशिक्षण देण्याची नितांत आवश्यकता आहे !

कळंबोली सर्कल येथे तेलाचा कंटेनर उलटला !

वाहने घसरून पडल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. कळंबोली अग्निशमन दलाने मार्ग धुतला. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

शिरूर (पुणे) येथे पोलिसांनी तिरंग्याचा अवमान केल्याचा आरोप !

तालुक्यातील मांडवगण फराटा येथे ‘हर घर तिरंगा’ या मोहिमेच्या अंतर्गत १३ ऑगस्ट या दिवशी ध्वजारोहण करतांना त्या ठिकाणची कोणत्याही प्रकारची स्वच्छता न करताच ध्वजारोहण करण्यात आले.

राष्ट्रवादी लोकांनी अराजक माजवू पहाणार्‍या लोकांवर अंकुश ठेवावा ! – महंत रामगिरी महाराज

समाजात तेढ निर्माण होण्यासारखे बोललो नसल्याचे प्रतिपादन