मुंबई – पश्चिम रेल्वेमार्गावरील चर्चगेट-विरार वातानुकूलित रेल्वेगाडीत चुकीचे तिकीट काढल्याने दंडाची रक्कम भरण्यास सांगणार्या जसबीर सिंग या वयस्कर तिकीट तपासनीसाला सरकारी कर्मचार्यांनी मारहाण केली आहे. यात तिकीट तपासनीस घायाळ झाले. या मारहाणीचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे. तिकीट तपासनीसासमवेत झालेल्या झटापटीत त्यांच्याजवळील अन्य दंडाची दीड सहस्र रुपये रक्कम गहाळ झाली. या वेळी आरोपींनी अपशब्दही वापरले. रेल्वे पोलिसांनी गाडीत चढून हे प्रकरण सोडवले.
गुन्हा नोंद झाल्यास सरकारी नोकरी जाण्याच्या भीतीने मारहाण करणार्या प्रवाशांनी काही वेळाने लिखित क्षमायाचना केली आणि दंडाची रक्कमही भरली.
संपादकीय भूमिका :
|