पुणे – येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रिडा संकुलामध्ये थाटात शुभारंभ झाला. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सहस्रो महिला या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.
कार्यक्रमाविरोधात महाळुंगे ग्रामस्थांचा निषेध !
महाळुंगे ग्रामस्थांनी गावाच्या नावाचा उल्लेख कार्यक्रम पत्रिकेसह कुठेच नसल्याने ग्रामस्थांनी निषेध केला आहे. शासनाकडून ‘बालेवाडी स्टेडियम’ असा उल्लेख केला जात आहे. महाळुंगे बालेवाडी असा उल्लेख अपेक्षित असतांनाही शासनाकडून तो होत नाही. ग्रामस्थांनी ११३ एकर भूमी या स्टेडियमसाठी दिली आहे.