शिरूर (पुणे) येथे पोलिसांनी तिरंग्याचा अवमान केल्याचा आरोप !

पंतप्रधान मोदी यांना पत्राद्वारे कारवाई करण्याचे निवेदन !

शिरूर (जिल्हा पुणे) – शिरूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत मांडवगण फराटा पोलीस चौकी येते. तालुक्यातील मांडवगण फराटा येथे ‘हर घर तिरंगा’ या मोहिमेच्या अंतर्गत १३ ऑगस्ट या दिवशी ध्वजारोहण करतांना त्या ठिकाणची कोणत्याही प्रकारची स्वच्छता न करताच ध्वजारोहण करण्यात आले. त्यामुळे एकप्रकारे तिरंगा ध्वजाचा अवमान झाला असल्याने संबंधित पोलीस कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी ‘पुणे जिल्हा अखिल भारतीय ग्राहक पंचायती’चे सचिव संतोष शिर्के यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. ‘शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे, मांडवगण फराटा चौकीचे साहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश कदम यांच्यावर कारवाई करण्यात यावी’, अशी मागणी पत्रामधून केली आहे.