कळंबोली सर्कल येथे तेलाचा कंटेनर उलटला !

दुचाकी घसरून मुलीचा मृत्यू

तेलाची वाहतूक करणारा कंटेनर उलटला

कळंबोली – येथील सर्कलजवळ तेलाची वाहतूक करणारा कंटेनर उलटला. त्यामुळे तेथे महामार्गावर सर्वत्र तेल सांडले. तेलावरून घसरून काही दुचाकीस्वारांचा अपघात झाला असून यात पाले बुद्रुक गावातील राजनंदिनी रमेश जाधव (वय १९ वर्षे) हिचा मृत्यू झाला आहे. वाहने घसरून पडल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. कळंबोली अग्निशमन दलाने मार्ग धुतला. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.