सध्याच्या पिढीचे झालेले नैतिक अध:पतन दर्शवणारी घटना !
पुणे – येथील हडपसर परिसरातील एका नामांकित शाळेतील विद्यार्थ्यांनी त्यांच्याच वर्गातील विद्यार्थिनींचे नग्न छायाचित्र सामाजिक माध्यमांवर प्रसारित केले. या विद्यार्थ्यांनी संबंधित विद्यार्थिनींचे छायाचित्र मिळवले आणि ते ‘मॉर्फ’ करत (संगणकीय प्रणालीद्वारे व्यक्तीच्या मूळ छायाचित्रात पाटल करून ते विकृत करणे) सामाजिक माध्यमांवर प्रसारित केले. एका पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दहावीत शिक्षण घेणार्या ३ विद्यार्थ्यांना हडपसर पोलिसांनी कह्यात घेतले आहे. १६ जून ते ३० जून या कालावधीत हा प्रकार घडला आहे. या सर्व मुलांना बाल न्यायालयासमोर उपस्थित केले जाणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त आर्. राजा यांनी दिली.
संपादकीय भूमिका :एवढ्या लहान वयात मुलांची अशी मानसिकता असेल, तर पुढे ही मुले कशी निपजतील ? याचा विचारच न केलेला बरा ! अशा विकृतांवर अंकुश ठेवण्यासाठी त्यांना धर्मशिक्षण देण्याची नितांत आवश्यकता आहे ! |