मुंदकाईमध्ये (केरळ) बचाव कार्यासाठी तातडीने पूल उभारणार्या ‘मद्रास सॅपर्स’च्या मेजर सीता शेळके आणि त्यांचे पथक !
मेजर सीता शेळके यांनी त्यांच्या पथकासह ३१ घंटे क्षणभरही विश्रांती न घेता १९ पोलादी पॅनल्सच्या साहाय्याने हा पूल उभारला. पुलावरुन अवजडसामुग्री, रुग्णवाहिका तातडीने मुंदकाईकडे रवाना होऊ लागली.