१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (प.पू. डॉक्टर) पू. दातेआजी यांच्याबद्दल म्हणाले, ‘‘पू. दातेआजी यांच्या चेहर्याकडे पाहून चांगले वाटते. त्यांचे मनही आनंदी आहे.’’
२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि साधक यांनी केलेले नामजपादी उपाय अन् त्याचे परिणाम
८.६.२०२४ या दिवशी प.पू. डॉक्टर आणि साधक यांनी केलेले नामजपादी उपाय अन् त्याचे परिणाम पुढील सारणीत दिले आहेत.
टीप – प्रयोग केल्यावर दाते कुटुंबातील चौघांनाही तसेच जाणवले.
प्रयोगाच्या वेळी प.पू. डॉक्टर आम्हाला म्हणाले, ‘‘पू. दातेआजी शुद्धीत असतांना त्यांचे डोके आणि पाय दुखत असल्यावर जसे चेपत असतो, तसेच त्या शुद्धीत नसतांनाही त्यांचे डोके अन् पाय चेपावेत. पू. दातेआजी यांच्याकडे पाहिल्यावर ‘त्या आजारी आहेत’, असे जाणवत नाही.’’
प्राणशक्तीवहन उपाय पद्धतीचा लाभ करून घ्या !
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘पुढे येणार्या घोर आपत्काळात वैद्यकीय उपचार मिळणे दुरापास्त होणार आहे’, हे ओळखून मानवाला व्याधींवर मात करता येण्यासाठी प्राणशक्तीवहनातील अडथळे शोधणे आणि हाताच्या बोटांच्या मुद्रा अन् नामजप करणे, हे शिकवणारी उपायपद्धत शोधली आहे. या उपायपद्धतीद्वारे व्याधीग्रस्त व्यक्ती कुणाचेही साहाय्य न घेता स्वतःची व्याधी दूर करण्याचा प्रयत्न करू शकते किंवा उन्नत साधकही अन्य आजारी व्यक्तीसाठी या उपायपद्धतीद्वारे त्याची व्याधी दूर होण्यासाठी प्रयत्न करू शकतात.
सनातनच्या ४८ व्या संत पू. (श्रीमती) निर्मला दाते (वय ९१ वर्षे) या सध्या गंभीर आजारी (बेशुद्ध) असून त्या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात रहात आहेत. त्यांच्या या गंभीर आजारपणात आधुनिक वैद्य त्यांच्यावर औषधोपचार करत आहेत. याचसमवेत स्वतःची प्राणशक्ती अत्यल्प असतांनाही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी पू. आजींसाठी नामजपादी उपाय केले, तसेच अन्य साधकांना नामजपादी उपाय सांगून त्यांच्याकडून उपाय आणि काही प्रयोगही करवून घेतले. उपायपद्धतीमुळे काय फरक जाणवतो ? याचाही अभ्यास केला. या प्रयोगातून आध्यात्मिक स्तरावर होणारा लाभ साधक आणि समाज यांना शिकता येईल, तसेच या उपचारपद्धतीचे महत्त्वही यातून अधोरेखित होईल, या दृष्टीने ही लेखमाला येथे प्रसिद्ध करत आहोत.
– संपादक
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
– सौ. ज्योती दाते (पू. आजींची सून, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ६० वर्षे), पुणे (१२.६.२०२४)