honourpoint.in : विंग कमांडर अफराज (निवृत्त) यांनी २६ सहस्रांहून अधिक वीरगतीला प्राप्‍त सैनिकांच्‍या माहितीसाठी बनवले संकेतस्‍थळ !

जे सरकारला करायला हवे, ते नागरिकांना करावे लागत आहे, हे लज्‍जास्‍पद !

नालासोपारा येथे २५ महिलांशी विवाह करणार्‍या धर्मांधाला अटक !

अशा प्रकारे महिलांची फसवणूक करणार्‍या धर्मांधाचे विवाहाच्या माध्यमातून जिहादचे षड्यंत्र नव्हे ना, याची चौकशी करायला हवी !

थोडक्यात पण महत्वाचे : मुंबईत ‘स्वाईन फ्लू’चा विळखा !….प्रशासनाला न जुमानता चालकाने ट्रक पाण्यात घातला ! 

पावसाळ्यात डेंग्यू आणि हिवताप यांसमवेत ‘स्वाईन फ्लू’च्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. खासगी रुग्णालयांत प्रतिदिन २० ते २५ ‘स्वाईन फ्लू’चे रुग्ण आढळून येत आहेत.

‘सकाळ माध्यम समुहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्याकडून ‘महाराष्ट्र अंनिस’ला १ कोटी रुपयांची देणगी !

विविध घोटाळ्यांच्या प्रकरणी साहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयाने अंनिसच्या न्यासावर प्रशासक नेमण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे या पूर्वी महाराष्ट्र अंनिसला मिळालेल्या निधीचे काय केले ? हे घोषित केले पाहिजे !

विशाळगडावरील अतिक्रमणे वेळेत न काढणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करण्याच्या संदर्भात मंचर (पुणे) येथे निवेदन !

‘कह्यात घेतलेल्या निरपराध हिंदूंना मुक्त करावे, तसेच विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याची चालू झालेली मोहीम सर्व अतिक्रमणे हटवून पूर्ण करावी’, अशी मागणी या वेळी निवेदनाद्वारे करण्यात आली.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या ११ आमदारांनी घेतली शपथ !

महाराष्ट्र विधान परिषदेच्या ११ सदस्यांनी २८ जुलै या दिवशी आमदारकीची शपथ घेतली. उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी सर्व सदस्यांना आमदारकीची शपथ दिली.

सांगली येथे पूर ओसरताच पूर बाधित भागात स्वच्छता मोहीम जोमाने चालू !

पूर ओसरल्यानंतर कोणत्याही प्रकारची रोगराई किंवा नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी दक्षता घेण्यात येत आहे. पाणीपातळी अल्प होईल तशी स्वच्छता मोहीम तीव्र करण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. रवींद्र ताटे यांनी दिली.

कल्याणीनगर ‘पोर्शे’कार अपघात प्रकरणी पोलिसांकडून ९०० पानांचे आरोपपत्र प्रविष्ट

विशाल अग्रवाल, शिवानी अग्रवाल, डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरि हाळनोर, अशपाक मकानदार, अतुल घटकांबळे यांना आरोपी करण्यात आले आहे. या प्रकरणातील ५० साक्षीदारांच्या जबाबांची नोंद दोषारोपपत्रात करण्यात आली आहे.

नृसिंहवाडीत ‘देव गावात आल्या’चा भावपूर्ण उत्सव !

२७ जुलैला रात्री ११.४५ वाजता दत्त मंदिरातील टेंबे स्वामी मंदिराच्या कट्ट्यावरील पायरीवर कृष्णा-पंचगंगा नदीचे पाणी पोचले. यानंतर ‘श्री गुरुदेव दत्त’च्या जयघोषात देव (‘श्रीं’ची उत्सवमूर्ती) गावात आणण्यात आले.

पाऊस ओसरल्याने पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत संथगतीने उतार !

कोल्हापूर शहरात अनेक उपनगरांमध्ये पाणी असून जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर मांगूर फाट्याजवळ पाणी आल्याने एकेरी वाहतूक चालू होती.