कल्याणीनगर ‘पोर्शे’कार अपघात प्रकरणी पोलिसांकडून ९०० पानांचे आरोपपत्र प्रविष्ट

कल्याणीनगर अपघातात वापरले गेलेलं वाहन (संग्रहित चित्र)

पुणे – कल्याणीनगर ‘पोर्शे’कार अपघात प्रकरणी पुणे पोलिसांनी आरोपींच्या विरोधात ९०० पानांचे आरोपपत्र न्यायालयामध्ये प्रविष्ट केले. सीसीटीव्हीचे पंचनामे, तांत्रिक पुरावे, ‘क्रॅश इम्पॅक्ट असेसमेंट अहवाल’, अन्य अहवालही पोलिसांनी दिले आहेत. विशाल अग्रवाल, शिवानी अग्रवाल, डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरि हाळनोर, अशपाक मकानदार, अतुल घटकांबळे यांना आरोपी करण्यात आले आहे. या प्रकरणातील ५० साक्षीदारांच्या जबाबांची नोंद दोषारोपपत्रात करण्यात आली आहे. कल्याणीनगर भागात १९ मेच्या मध्यरात्री बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने मद्य पिऊन भरधाव वेगात चालवलेल्या ‘पोेर्शे’कारने दुचाकीस्वाराला धडक दिली. या धडकेत दोघांचा मृत्यू झाला होता.

गाडीचालक अल्पवयीन मुलास कह्यात घेतले. त्यांच्या येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद प्रविष्ट केला. परंतु बाल न्याय मंडळाने आरोपीस तात्काळ जामीन देतांना केवळ ३०० शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा दिली. त्यावरून सामाजिक माध्यमांतून टीका झाली. या अपघात प्रकरणात आरोपींना साहाय्य करणार्‍या ६ जणांवर आरोप ठेवण्यात आले आहे.