सांगली येथे पूर ओसरताच पूर बाधित भागात स्वच्छता मोहीम जोमाने चालू !

कृष्णा नदीतील पाण्याच्या पातळीत घट, ३९.६ फूट पाणी !

कृष्णा नदीतील पाण्याच्या पातळीत घट

सांगली, २८ जुलै (वार्ता.) – येथील कृष्णा नदीच्या पात्रातील पाण्यात घट होत असून ३९.६ फूट पाण्याची पातळी आहे. २७ जुलै या दिवशी ही पातळी ४० फूट होती. गेल्या २ दिवसांपासून सांगली आणि मिरज येथे पाऊस अल्प झाला आहे. पूर ओसरल्यानंतर महापालिका प्रशासनाने लगेच स्वच्छता मोहीम हाती घ्यावी, असा आदेश महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिले होते. त्यानुसार पूरबाधित क्षेत्रात स्वच्छता मोहीम चालू करण्यात आली आहे.

पूर ओसरल्यानंतर कोणत्याही प्रकारची रोगराई किंवा नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी दक्षता घेण्यात येत आहे. पाणीपातळी अल्प होईल तशी स्वच्छता मोहीम तीव्र करण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. रवींद्र ताटे यांनी दिली.