पुणे – काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस चालू आहे. सिंहगडावर २९ जुलै या दिवशी झालेल्या पावसाने रात्री दरड कोसळल्याची घटना घडली. दरड हटवण्याचे काम चालू असून प्रशासनाने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे. पर्यटकांचे आकर्षणाचे ठिकाण असलेल्या सिंहगडाचे पर्यटन काही दिवस बंद केले आहे. दगड-मातीचा मोठा ढीग रस्त्यावर आल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे.