वैद्यकीय अधिकारी संवर्गाच्या पद भरतीसाठी शासन सकारात्मक ! – मंत्री उदय सामंत

उदय सामंत, मंत्री

मुंबई, ३ जुलै (वार्ता.) – राज्यातील सर्व प्रकारच्या महानगरपालिकांच्या वैद्यकीय अधिकारी संवर्गातील पदाच्या भरतीविषयी शासन सकारात्मक आहे. याविषयी लवकरच धोरणात्मक निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत ३ जुलै या दिवशी प्रश्नोत्तरात दिली. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या अंतर्गत वैद्यकीय अधिकार्‍यांची रिक्त पदे भरण्याविषयी सदस्य विक्रम काळे यांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देतांना ते बोलत होते.