मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शासनाचा प्रयत्न ! – शंभूराज देसाई, राज्य उत्पादन शुल्क मंत्री

विधान परिषद प्रश्नोत्तर…

मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, ३ जुलै (वार्ता.) – मराठा समाजाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या शब्दांप्रमाणे कायद्यात टिकणारे आरक्षण देण्यासाठी राज्यशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे, असे उत्तर राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी ३ जुलै या दिवशी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या वेळी दिले. याविषयी सदस्य विक्रम काळे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या वेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री कपिल पाटील, अमोल मिटकरी, जयंत पाटील यांनी सहभाग घेतला.