विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी ११ जागांसाठी १४ जणांचे आवेदन !

मुंबई, ३ जुलै (वार्ता.) – विधान परिषदेच्या ११ जागांसाठी २ जुलै या दिवशी एकूण १४ जणांनी आवेदन प्रविष्ट केले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर यांना रिंगणात उतरवले आहे. उमेदवारी आवेदन मागे घेण्याची मुदत ५ जुलैपर्यंत आहे. जर एकाही उमेदवाराने आवेदन मागे न घेतल्यास निवडणूक होणे निश्चित आहे; मात्र निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी सर्वच पक्षांकडून प्रयत्न चालू आहेत.

१. भाजपचे उमेदवार म्हणून सौ. पंकजा मुंडे पालवे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, अमित गोरखे, योगेश टिळेकर यांनी आवेदन प्रविष्ट केले. अजित पवार गटाचे शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांचे आवेदन प्रविष्ट केले आहे.

२. भाजपचे सध्या १०३ आमदार आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी माजी खासदार कृपाल तुमाने आणि भावना गवळी यांना संधी दिली.

३. अजित पवार यांच्याकडे ४२ आमदार असले, तरी त्यांनी शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर हे २ उमेदवार उभे केले आहेत. त्यांना जिंकण्यासाठी ४ अतिरिक्त मते जमा करावी लागतील.