विदेशी दूतावासांत स्फोट घडवण्याचे षड्यंत्र रचणार्‍या फरार आतंकवाद्याला अटक !

चेन्नई येथील अमेरिकेचे दूतावास अन् बेंगळुरू येथील इस्रायलचे दूतावास येथे स्फोट घडवून आणण्याचे षड्यंत्र रचणार्‍या नुरुद्दीन उपाख्य रफी या आतंकवाद्याला ‘केंद्रीय अन्वेषण यंत्रणे’च्या (‘एन्.आय.ए.’च्या) अधिकार्‍यांनी म्हैसुरू येथे नुकतीच पुन्हा अटक केली.

मिठगवाणे (ता. राजापूर) येथील श्रमिक पतसंस्था फोडून १ कोटी रुपयांच्या मुद्देमालाची चोरी

मिठगावणे येथे श्रमिक पंतसंस्थेत काम करणारे कर्मचारी १४ मे या दिवशी नेहमीप्रमाणे पतसंस्थेमध्ये गेले असता त्यांना पतसंस्थेचे ‘शटर’ आणि दरवाजाची कडी कोयंडी उचकटलेली दिसून आली.

रत्नागिरी येथील सीए शाखेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

सीएच्या अभ्यासक्रमात अभ्यासाचे नियोजन करण्यास पुष्कळ महत्त्व आहे. दिवसाचे नियोजन, वेळेचे व्यवस्थापन याचा मेळ कसा घालावा ? याविषयी सखोल मार्गदर्शन सीए अमृता कुलकर्णी यांनी या वेळी केले.

‘मी कोकणी उद्योजक’ म्हणून चिपळूण येथील प्रशांत यादव यांचा होणार सन्मान !

 दूध आणि दुग्धजन्य पदार्थ बनवणारा कोकणातील एकमेव आणि पहिला प्रकल्प प्रशांत यादव यांनी सत्यात आणला.

आपत्तीविरोधात लढण्यासाठी चिपळूण नगर परिषदेकडून २ दिवसांचे प्रशिक्षण

आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालीच तर त्याला कशा प्रकारे सामोरे जावे ? वेळीच साहाय्य कसे पोचवता येईल आणि होणारी हानी कशी  टाळता येईल, यासाठी चिपळूण नगर परिषद आतापासूनच सतर्क झाली आहे.

शरद पवार धर्मनिरपेक्ष नव्हेत, संधीसाधू आहेत ! – प्रकाश आंबेडकर, अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी

या वेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले, ‘‘उद्धव ठाकरे हे धर्मवादी आहेत. उद्धव ठाकरे यांना भाजपमध्ये जाण्याविना पर्याय नाही. शरद पवार यांचीही मी शाश्वती देत नाही.

वेदगंगा नदीत ४ जण बुडाले !

कोल्हापुरातील आणूर गावातील यात्रेसाठी ते आले होते. नदीवर कपडे धुण्यासाठी गेल्यावर त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडे याला अटक !

अटकेनंतर भावेश भिंडे याला मुंबईत आणण्यात आले असून या प्रकरणाचे अन्वेषण गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आले आहे.

बीड येथे पोलिसांच्या घरात सापडले १ कोटी रुपये, तसेच सोन्या-चांदीचे दागिने !

पोलीस खात्यात असे पोलीस असतील, तर कधीतरी देश भ्रष्टाचारमुक्त होईल का ? अशांना कठोर शिक्षाच हवी !

कल्याण-डोंबिवली परिसरात घरफोड्या वाढल्या !

सलग ४ दिवस कल्याण पूर्व आणि डोंबिवली येथे घरफोड्या करण्यात आल्या. यात चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज चोरला आहे.