मुंबई – घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडे याला उदयपूर (राजस्थान) येथील एका रिसॉर्टमधून मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी अटक केली आहे. १६ मे या दिवशी सायंकाळी भावेश भिंडे याला अटक करण्यात आली. घाटकोपर येथील दुर्घटनेनंतर भावेश भिंडे भूमीगत झाला होता. मागील ३ दिवसांपासून पोलीस त्याच्या मागावर होते. दुर्घटनेत १६ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ७४ हून अधिक या दुर्घटनेत घायाळ झाले आहेत. या प्रकरणी भावेश भिंडे याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अटकेनंतर भावेश भिंडे याला मुंबईत आणण्यात आले असून या प्रकरणाचे अन्वेषण गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आले आहे.