‘मी कोकणी उद्योजक’ म्हणून चिपळूण येथील प्रशांत यादव यांचा होणार सन्मान !

सौजन्य:माझे कोकण

चिपळूण – शिवभक्त कोकण आणि निल क्रिएटर यांच्या संयुक्त विद्यमाने येथील उद्योजक प्रशांत यादव यांचा २६ मे या दिवशी मान्यवरांच्या हस्ते मुंबई येथील साहित्य संघ नाट्यगृहात सन्मान होणार आहे.  दूध आणि दुग्धजन्य पदार्थ बनवणारा कोकणातील एकमेव आणि पहिला प्रकल्प प्रशांत यादव यांनी सत्यात आणला. वाशिष्ठी मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्ट्सच्या माध्यमातून कोकणातील अनेक लोकांना व्यावसायिक बनण्यासाठी साहाय्यक आणि संपूर्ण कोकणची अर्थक्रांती पालटणारा हा प्रकल्प ठरणार आहे. यासाठीच ‘मी कोकणी उद्योजक’ म्हणून प्रशांत यादव यांचा गौरव केला जाणार आहे. प्रशांत यादव यांना व्यावसायिक सन्मान घोषित झाल्यामुळे त्यांचे अभिनंदन केले जात आहे.